
दबाव वृत्त्: १ डिसेंबरपासून सरकार सिमकार्ड खरेदीच्या नियमात बदल करणार आहे. हे नियम आधी १ऑक्टोबर २३ पासून लागू केले जाणार होते, परंतु सरकारने ते दोन महिन्यांनी वाढवले आणि आता १ डिसेंबरपासून ते लागू करण्याची तयारी केली जात आहे. तुम्ही सिम डीलर किंवा सिम कार्ड खरेदी करणार असाल तर तुम्हाला या नियमांची संपूर्ण माहिती असली पाहिजे. जर तुम्हाला हे नियम माहित नसतील तर तुम्ही नंतर अडचणीत येऊ शकता.
नवीन नियमांनुसार सिम विकणाऱ्या डीलर्सला आपलं पोलिस व्हेरिफिकेशन आणि बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन करावं लागेल. यासोबतच सिम विकण्यासाठी रजिस्ट्रेशनही करणं गरजेचं असेल.
