नव्या रूपात Kawasaki Ninja ZX-4RR भारतात लाँच, लूक आहे एकदम कडक..

Spread the love

जपानी बाईक उत्पादक कावासाकीने नवीन बाईक लाँच केली आहे. 5 Kawasaki Ninja ZX-4RR असे या नवीन बाईकचे नाव आहे.

भारतात नेहमीच बजेट फ्रेंडली बाईक्स उपलब्ध असतात. या बाईकच्या किंमती किफायतशीर तर असतात पण त्यासोबत त्या परफॉर्मन्सच्या बाबतीत सुद्धा उत्तम असतात. याव्यतिरिक्त भारतात एक असा वर्ग देखील आहे जो लक्झरी आणि हाय परफॉर्मन्स बाईक्ससाठी सुद्धा दिवाना आहे.

या बाईक्स हाय परफॉर्मन्ससाठी ओळखल्या जातात. तसेच या दिसण्यात तर स्टायलिश असतातच पण त्यासोबतच त्यांच्या किंमती सुद्धा सवासामन्यांना घाम फोडणाऱ्या असतात. नुकतेच आत एक स्टायलिश आणि भारतीय तरुणांना भुरळ घालणारी बाईक मार्केटमध्ये लाँच झाली आहे.

अनेक पेट्रोल डिझेल कार्स लाँच होत असल्या तरी तुम्ही इलेक्ट्रिक कारच कार निवडावी?..

जपानी बाईक निर्माता कंपनी Kawasaki ने आपली जुनी बाईक नवीन अपडेट्ससह भारतीय बाजारात लाँच केली आहे. कंपनीने 2025 Kawasaki Ninja ZX-4RR लाँच केली आहे. जागतिक बाजारपेठेत लाँच केल्यानंतर कंपनीने ही बाईक लगेच भारतात आणली आहे. ही बाईक नवीन कलर ऑप्शनसह नवीन फीचर्ससह सादर केली गेली आहे. 2025 Kawasaki Ninja ZX-4RR मध्ये काय नवीन असणार आहे याबद्दल जाणून घेऊया.

दमदार इंजिन-

नवीन कावासाकी निन्जा ZX-4RR मध्ये 399 cc, लिक्विड-कूल्ड, इनलाइन-फोर इंजिन वापरण्यात आले आहे. हे इंजिन 77 बीएचपी पॉवर आणि 39 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे रॅम एअरसह 80 बीएचपी पॉवर देखील जनरेट करते. बाईकचे इंजिन सहा-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे.

फीचर्स-

नवीन कावासाकी निन्जा ZX-4RR ला स्टाइलिंग शार्प फेअरिंग, ट्विन-एलईडी हेडलाइट्स आणि अपस्वेप्ट टेल देण्यात आले आहेत, ज्यामुळे ही बाईक पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक दिसते. त्याच्या बॉडीवर्कच्या खाली एक हाई-टेंसिल स्टील ट्रेलिस फ्रेम दिले गेले आहे. त्याच वेळी, हे USD फोर्क आणि बॅक-लिंक मोनोशॉकद्वारे सस्पेंड केले जाते. बाईकमध्ये 17 इंची व्हील बसवण्यात आले आहेत. ब्रेकिंगसाठी, समोर 290 मिमी ड्युअल डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 220 मिमी डिस्क ब्रेक लावले आहे.

कधी कारचे अंतिम संस्कार पहिले आहे का?

या नवीन बाईकमध्ये चार राइड मोड आहेत. यात ट्रॅक्शन कंट्रोल आणि ड्युअल-चॅनल एबीएस देखील आहे. यात कलर टीएफटी डिस्प्ले आहे. नवीन निन्जा ZX-4RR नवीन कलर ऑप्शनमध्ये आणले गेले आहे. या कलर्सची नावे लाइम ग्रीन/एबोनी/ब्लिझार्ड व्हाइट असे आहेत. याशिवाय बाईकमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

किंमत किती?..

2025 Kawasaki Ninja ZX-4RR भारतात 9.42 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत लाँच करण्यात आली आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत त्याची किंमत 32,000 रुपये अधिक आहे. कावासाकी निन्जा ZX-4RR मर्यादित संख्येत भारतात आणण्यात आली आहे. जर तुमचा बजेट असेल आणि ही बाईक विकत घ्यायची असेल तर तुम्ही जास्त वाट पाहू नका. या बाईकचे बुकिंगही सुरू झाले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page