भंडारा- आतापर्यंत ६,५०० ज्येष्ठ नागरिकांचे अयोध्यावारीचे स्वप्न पूर्ण विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरु झालेली मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रा आचारसंहिता लागल्यापासून बंदच असून अद्यापही नव्याने अर्ज स्वीकारणे सुरु झालेेले नाही. निवडणुकीपूर्वी राज्यातील ६,५०० ज्येष्ठ नागरिकांचे अयोध्यावारीचे स्वप्न पूर्ण झाले होते. त्यामुळे त्यामुळे ही योजना केवळ विधानसभेच्या ‘मतदर्शना’साठीच होती काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात सत्ताधारी महायुतीला मोठा फटका बसला. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अाणि लाडकी बहीण याेजनेसह इतरही याेजनांची घाेषणा केली. या याेजनांचे लाभही सुरू झाले. मात्र, १५ ऑक्टोबर २०२४ रोजी विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी नव्याने अर्ज स्वीकारणे थांबवले गेले. आचारसंहिता संपल्यानंतर अद्यापही अर्ज स्वीकारणे सुरू झाले नाही. दरम्यान, याप्रकरणी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
७३ तीर्थक्षेत्रांचा समावेश-
वैष्णोदेवी मंदिर, यमुनोत्री मंदिर, उत्तरकाशी कामाख्यादेवी मंदिर, महाकालेश्वर मंदिर, उज्जैन, अमरनाथ गुहा, वैद्यनाथ धाम, देवघर, गुवाहाटी ओंकारेश्वर मंदिर, ममलेश्वर मंदिर (खंडवा), ब्रह्मपुरी सुवर्ण मंदिर, काशी विश्वनाथ मंदिर, महाबोधी मंदिर, श्री रंगनाथस्वामी मंदिर, अक्षरधाम मंदिर, वाराणसी रणकपूर मंदिर, पाली गोमटेश्वर मंदिर, श्री दिगंबर जैन लाल मंदिर इ. ७३ तीर्थक्षेत्रांचा योजनेत समावेश करण्यात आला आहे.
योजनेसाठी पात्रता-
▪️लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक.
▪️वय ६० आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकच पात्र.
ज्येष्ठांनी अयोध्येत घेतले रामलल्लाचे दर्शन; रेल्वेद्वारे प्रवास
राज्यातील ८०० लाभार्थींची पहिली रेल्वे कोल्हापुरातून तर विदर्भातील ८०० लाभार्थींची पहिली रेल्वे भंडारा जिल्ह्यातून अयोध्येला प्रस्थान करण्यात आली होती. राज्यातील ६० वर्षांवरील किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्वधर्मीय ज्येष्ठांसाठी राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा लाभ भंडारा जिल्ह्यातील ८०० जणांना मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांना या योजनेचा लाभ मिळाला.
नवीन अर्ज स्वीकारण्याबाबत शासनाचे अद्याप आदेश नाहीत…
आचारसंहिता संपल्यानंतर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचे अर्ज नव्याने स्वीकारण्याबाबत शासनाकडून आदेश आले नाहीत. आदेश येताच अर्ज स्वीकारण्यात येतील. – सचिन मडावी, सहायक आयुक्त, समाजकल्याण, भंडारा
लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम अडीच लाखांपेक्षा जास्त नसावी. निवडणुकीपूर्वी एका जिल्ह्यातून सरासरी ८०० ज्येष्ठ नागरिकांचे होते टार्गेट.
दरडोई ३० हजार रुपये खर्च…
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत जिल्हानिहाय निश्चित केलेल्या कोट्याच्या आधारे लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या पात्र व्यक्तींना निर्धारित तीर्थस्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेसाठी एकावेळी लाभ घेता येतो. यात प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास आदींचा समावेश आहे. प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रतिव्यक्ती ३० हजार रुपये असून हा खर्च सरकारकडून करण्यात येतो राज्यात आतापर्यंत ९ जिल्ह्यांमधून एकूण ६५०० ज्येष्ठांनी याचा लाभ घेतला आहे.तोंडावर सुरू केलेल्या तीर्थदर्शन योजनेची कवाडे बंद; आचारसंहिता लागताच नवीन अर्ज थांबवले, ज्येष्ठ नागरिकांचा हिरमोड..
७३ तीर्थक्षेत्रांचा समावेश-
वैष्णोदेवी मंदिर, यमुनोत्री मंदिर, उत्तरकाशी कामाख्यादेवी मंदिर, महाकालेश्वर मंदिर, उज्जैन, अमरनाथ गुहा, वैद्यनाथ धाम, देवघर, गुवाहाटी ओंकारेश्वर मंदिर, ममलेश्वर मंदिर (खंडवा), ब्रह्मपुरी सुवर्ण मंदिर, काशी विश्वनाथ मंदिर, महाबोधी मंदिर, श्री रंगनाथस्वामी मंदिर, अक्षरधाम मंदिर, वाराणसी रणकपूर मंदिर, पाली गोमटेश्वर मंदिर, श्री दिगंबर जैन लाल मंदिर इ. ७३ तीर्थक्षेत्रांचा योजनेत समावेश करण्यात आला आहे.