नेरळ- सुमित क्षीरसागर- नेरळ व्यापारी फेडरेशनची 2024 ची नव्याने कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.कमिटीचा कार्यकाळ संपल्याने नव्याने कमिटी स्थापन करायची होती त्यासाठी नावे घेण्यात आली होती.यावेळी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या व्यापारी फेडरेशनच्या अध्यक्षपदी व्यापारी मनोहर अहिरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली,सोबतच महत्वाचे पद असलेल्या कमिटीच्या सेक्रेटरी पदी विशाल साळुंके या तरुणाची बिनविरोध निवड करण्यात आली.
कर्जत तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणून नेरळ बाजारपेठेची ओळख आहे.दिवसाला लाखोंची उलाढाल होत असलेल्या या व्यापारी संघटनेची नेरळ व्यापारी फेडरेशन या नावाची अधिकृत संघटना कार्यरत आहे. शेकडो व्यापारी वर्ग एकत्र असलेल्या या संघटनेत दर दोन वर्षांच्या कालावधीसाठी नव्याने एक कार्यकारणी कमिटीची स्थापना करण्यात येते,या संघटनेचा पदाधिकारीच येथे कमिटीवर निवडला जातो.दरम्यान अगोदरच्या कार्यकारणीचा दोन वर्षांचा कार्यकाळ संपल्याने नुकताच सन 2024 ची नव्याने कार्यकारणी करण्याचे कमिटी कडून जाहीर करण्यात आले होते,त्यानुसार नेरळ साने सभागृहात नुकताच पार पडलेल्या या व्यापारी वर्गाच्या सर्वसाधारण सभेत फेडरेशनच्या अध्यक्षपदी येथील व्यापारी मनोहर अहिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.सुरुवातीला अध्यक्ष पदासाठी विशाल साळुंके तर अहिरे ही दोन नावे इच्छुकामधून समोर आल्याने फेडरेशननी पाळलेल्या प्रोटोकॉल प्रमाणे बिनविरोध कमिटी निवडण्यात यावी म्हणून साळुंके यांनी आपल्या अधिकच्या वयाच्या व्यक्तीला मान देत कमिटीच्या सेक्रेटरीची सूत्र हाती घेतली.एकूणच व्यापारी संघटनेच्या अध्यक्ष पदी मनोहर अहिरे,उपाध्यक्ष प्रीतम गोरी व अरविंद कटारिया यांची निवड करण्यात आली तर सेक्रेटरी म्हणून विशाल साळुंके,खजिनदार अमित जैन तर
सदस्य:- विमल व्यास. योगेश जैन. रोशन जैन. आणि
सल्लागार पदी:- कमलेश ठक्कर, ललित जैन, निलेश शाह, परेश शहा, सलीम तांबोळी, पंढरी हजारे भद्रेश शहा, जयेद नजे,विनोद जैन यांची निवड करण्यात आली.
या नव्याने कार्यकारणी कमिटीच्या निवडीवेळी नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांना संघटनेकडून आमंत्रित करण्यात आल्याने त्यांच्या उपस्थितिचं खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या कार्यकरणी व्यापारी सदस्यांना ढवळे यांनी शुभेच्छा दिल्या.