नेरळ: सुमित क्षिरसागर – नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील असलेल्या राजेंद्रगुरू नगर तसेच वॉर्ड क्रमांक ५ मधील पथदिवे कित्येक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत तर काही अर्धवट प्रकाशित होतात. तरी नेरळ ग्रामपंचातमध्ये वेळोवेळी सांगून सुद्धा नेरळ ग्रामपंचायत जाणीव पूर्व दुर्लक्ष करत आहे असा स्थानिकांचा आरोप आहे.
नेरळ ग्रामपंचायत प्रभाग क्र. ५ म्हणजेच श्री राजेंद्रगुरुनगर नेरळ विभागातील अनेक ठिकाणचे पथदिवे सूर्यास्तानंतर प्रकाशित होत नाहीत याकडे ग्रामपंचायत नेरळच्या सदस्य नसलेल्या सरपंचांनी व सरपंच ग्रामपंचायत नेरळ यांच्या राजीनाम्यानंतर नेरळ ग्रामपंचायतीच्या प्रशासनाची सूत्रे ज्यांच्या हाती आहेत त्या ग्रामविकास अधिकाऱ्यांनी नेरळ ग्रामपंचात कडे लक्ष देणे आवश्यक होते तसेच नेरळ ग्रामपंचायत प्रभाग क्र.५ म्हणजेच श्री राजेंद्रगुरू नगर समस्यांकडे नेरळ ग्रामपंचायत ग्रामसेवक व प्रशासक यांचं दुर्लक्ष होताना दिसत आहे.
गणेशोत्सवापासून दीपोत्सवापर्यंतचा मोठा कालावधी हा प्रभाग क्रमांक ५ रस्त्यांवरील पथदिव्यांची पाहणी करून बंद पथदिवे पूर्ववत प्रकाशण्यासाठी कोणतीही कार्यवाही ग्रामपंचायत कडून झालेली नाही अथवा अशी कार्यवाही करण्यास कोणती अडचण आहे त्यामुळे विलंब होत आहे. याची माहिती सामान्य नागरिकांना होणे आवश्यक आहे. या करिता नेरळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहर प्रमुख संदीप उतेकर यांनी नेरळ ग्रामपंचायततिकडे वेळोवेळी निवेदने सादर करून पाठपुरावा करत आहेत.