दबावामुळे नीलिमाने आत्महत्या केली ?

Spread the love

नीलिमा चव्हाण प्रकारणात बँकेतील एकाला अटक !

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार
अजून एकजण अटक होण्याची शक्यता ?

रत्नागिरी- दापोली येथील स्टेट बँकेत ठेकेदार पद्धतीने कामाला असलेली नीलिमा चव्हाण आत्महत्या प्रकारणात आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी
काल वडीलांनी रीतसर तक्रार दिल्यावरच संशय व्यक्त केलेल्या आरोपीला अटक केली आहे.

दरम्यान अजून एक आरोपी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे

नीलिमा चव्हाण खून प्रकरणात घरच्यांनी बेपत्ता असल्याची तक्रार दिल्याने पोलिसांनी त्या दृष्टीने तपास केला. गेले 15 दिवस होऊन झाले तरी नीलिमा चव्हाण खून प्रकरणात पोलिसांना म्हणावी तशी प्रगती झाली नव्हती.

पोलिसांनी बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले होते.

परंतु काल जेव्हा नीलिमांच्या वडिलांनी अधिकृत संशय घेऊन काही लोकांची नावे पोलिसांपुढे सादर केली.

त्यातून या बँकेत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून असलेले संग्राम गायकवाड हे वारंवार नीलिमाला त्रास देत असल्याचे स्पष्ट झाले.

एकंदरीत माहितीवरून पोलिसांनी संग्राम गायकवाड याला अटक केली असून अजून एक जण असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान पोलिसांनी नोंदवलेल्या तक्रारीची तशीच्या तशी आम्ही माहिती देत आहोत.

संग्राम गायकवाड यांच्यावर 306 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला काल अटक करण्यात आली आहे. दिनांक : 18/०८/२०२३
दाभोळ आ.मृ. रजि क्र_०४/२०२३ CRPC कलम १७४ प्रकरणी भा.द.वि.सं चे कलम 306 अन्वये गुन्हा दाखल झाला होता.

दिनांक ०१ ऑगस्ट २०२३ रोजी दाभोळच्या खाडीत मृत अवस्थेत मिळालेल्या कुमारी. नीलिमा चव्हाण चे अकस्मात मृत्यू प्रकरणी दाभोळ पोलीस स्टेशन अधिक तपास करीत होते.

तसेच आजवरच्या तपासात प्रथम दर्शनी खालील बाबी निष्पन्न झालेल्या होत्या.
1) कु. नीलिमा हिच्या Viscera ची डॉक्टरांनी सामान्य व विशिष्ट रासायनिक चाचणी अंती कोणत्याही प्रकारचे विष दिसून आले नसल्याचे तपासणी अहवालामध्ये नमूद केले आहे.

तसेच मृत्यूचे अंतिम कारण हे “Asphyxia due to drowning” असे नमूद केले आहे.
2) आत्तापर्यंत पोलीसांमार्फत चिपळूण, खेड व दापोली येथील एसटी स्थानक, रेल्वे स्थानक व इतर ठिकाणचे CCTV footage ची पडताळणी करण्यात आलेली आहे.
या अकस्मात मृत्यूचा पोलीस तपास सुरू असताना दिनांक 17/08/2023 रोजी चिपळूण पोलीस ठाणे येथून 00/2023 नंबर ने दाभोळ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर_17/2023 भा.द.वि. संहिता चे कलम 306 अन्वये आत्महत्या करण्यास चिथावणी देऊन प्रवृत्त केल्याबाबत श्री. सुधाकर तुकाराम चव्हाण यांनी दिल्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल झाला आहे.

या गुन्ह्यातील फिर्यादी मध्ये श्री. सुधाकर तुकाराम चव्हाण यांनी असे नमूद केले आहे की,
“दि. १५.०४.२०२३ ते दि. २९.०७.२०२३ या मुदतीत, आपली मुलगी दापोली येथील ज्या बँक मध्ये काम करत होती त्या ठिकाणी असणाऱ्या प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाड मुळ रा. कोल्हापुर, याला आपल्या दैनंदिन कामकाजाबाबत रिपोर्टिंग करावे लगत असे व ऑफिस मध्ये तिच्या कामाबाबत मॅनेजर संग्राम गायकवाड याच्याकडून नेहमी 15 दिवसांचे टार्गेट पूर्ण करण्याकरिता तिला वारंवार सुट्टीवर असतानादेखील फोन येत असत.

आपल्या मुलीस दिवसाला 4-5 डी-मॅट खाती उघडण्याकरिता प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाड हा जाणून बुजून दबाव आणत असलेबाबत सुट्टीच्या दिवशी दरवेळी आपल्याला व तिचा भाऊ अक्षय यास नीलिमा सांगत असे.

प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाड याने नीलिमा नोकरीला लागल्यापासूनच तिच्यावर टार्गेट पूर्ण करण्याचा दबाव घातला होता.

व नीलिमाने आपला प्रामाणिक प्रयत्न करून देखील तिला काम जमत नसल्याचे बोलून, कामावरून काढून टाकण्याबाबत धमकी दिली होती व यातूनच ती चिंताग्रस्त झाली होती व घरामध्ये व्यवस्थित जेवत नसले बाबात देखील फिर्यादी मध्ये नमूद केले आहे.

श्री. सुधाकर तुकाराम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादी अन्वये दाभोळ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं 17/2023 भा.द.वि.सं चे कलम 306 अन्वये भा.द.वि. संहिता चे कलम 306 अन्वये आत्महत्या करण्यास चिथावणी देऊन प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल झाला आहे तसेच यातील आरोपित संग्राम सुरेश गायकवाड, वय 26, मुळ राहणार कोडोली, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर, सध्या राहणार. टी.आर.पी, रत्नागिरी यास गुन्ह्याच्या कामी दिनांक १७/०८/२०२३ रोजी २२.२० वाजता अटक करण्यात आली आहे.

सदर गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page