
संपादकीय ; महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे बंड केल्यानंतर अनेक नेते शिवसेनेत दाखल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या जखमेवर मीठ चोळणारी माहिती समोर आली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आज पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे विधानपरिषेदेवरील आमदार नीलम गोऱ्हे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. माध्यमात पक्षाची बाजू मांडणाऱ्या नेत्या म्हणून नीलम गोऱ्हे या परिचित आहेत. नीलम गोऱ्हे यांनी २२ फेब्रुवारी १९९८ रोजी शिवसेनेत प्रवेश केला होता तेव्हापासून त्या अत्यंत संयमाने, नेटाने आणि अभ्यासू वृत्तीने शिवसेनेची बाजू मांडत आहेत. यामुळे ठाकरेंचा आणखी एक आमदार फुटला आहे
नुकतंच ठाकरे गटाच्या विधान परिषेदेवरील आमदार मनिषा कायंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करून ठाकरेंची साथ सोडली होती. आज नीलम गोऱ्हे यांचं शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणे, हा ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का आहे.
या पक्ष प्रवेश सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थित आहे. मुख्यमंत्र्यांनी भगवी शाल देऊन नीलम गोऱ्हे यांचं शिवसेनेत स्वागत केलं. पक्ष प्रवेशानंतर नीलम गोऱ्हे यांनी आपली कोणतीही कोणाबद्दलही नाराजी नाही, असं यावेळी त्यांनी सांगितले