खेड तालुक्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश, विकासाभिमुख नेतृत्वामुळे संघटनेला नवे बळ:आमदार योगेश कदम…

Spread the love

खेड : गृहराज्यमंत्री तथा खेडचे आमदार योगेश कदम यांच्या मतदारसंघ दौऱ्यादरम्यान, खेड तालुक्यात एक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मधील प्रभावशाली युवा नेते, माजी आमदार तु. बा. कदम यांचे सुपुत्र व विधानसभा क्षेत्र उपाध्यक्ष श्री. अमित कदम तसेच माजी नगरसेवक श्री. तौसिफ खोत यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

हा पक्षप्रवेश विकासकामांवरचा विश्वास आणि शिवसेना पक्षप्रमुख तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे प्रेरित असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या पक्षप्रवेश सोहळ्याला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रामदासभाई कदम आणि आमदार योगेश कदम स्वतः उपस्थित होते. श्री. अमित कदम व श्री. तौसिफ खोत यांचा पक्षप्रवेश म्हणजे खेड तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये सकारात्मक बदलाची नांदी असल्याचे मत आमदार कदम यांनी व्यक्त केले.
“या तरुण नेतृत्वाच्या सहभागामुळे खेड तालुक्यात शिवसेनेच्या संघटनेला निश्चितच नवे बळ मिळेल. हा परिवर्तनाचा क्षण तालुक्याच्या विकासदृष्टीने निर्णायक ठरेल,” असे गौरवोद्गार आमदार योगेश कदम यांनी काढले.

या प्रवेशामुळे स्थानिक पातळीवर शिवसेनेची ताकद अधिक बळकट होणार असून, आगामी काळात विकासोन्मुख नेतृत्वासह नव्या राजकीय समीकरणांची नांदी स्पष्ट होताना दिसत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page