BREKING NEWS : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार पक्षाच्या सात आमदारांसह नॉट रिचेबेल असल्याची चर्चा

Spread the love

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार पक्षाच्या सात आमदारांसह नॉट रिचेबेल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. अजित पवार यांच्यासह पक्षाच्या सात आमदारांसह फोन नॉट रिचेबेल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असून त्यामुळे बड्या बड्या नेत्यांसह अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.अजित पवार काल सकाळी पुण्यामध्ये होते. त्यानंतर सात आमदारांसह संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

अजित पवार पक्षाच्या सात आमदारांसह नॉट रिचेबेल असल्याचे अनेकांनी ट्विट देखील केले आहे. अजित पवार नॉट रिचेबल असल्याचे काही राजकीय कारण आहे का, असाही प्रश्न विचारला जात आहे. कोविडमुळे हा नेता महाराष्ट्र बाहेर गेला असावा अशी ही शक्यता व्यक्त होत आहे. पण सोबत सात आमदार कशासाठी असाही प्रश्न याठिकाणी उपस्थित होताना दिसत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page