
संगमेश्वर अर्चिता कोकाटे- नवरात्र विशेष संगमेश्वर तालुक्यातील कडवई यादव वाडी येथील सलून व्यावसायिक नागेश यादव यांच्या सुविद्य पत्नी सौ नम्रता नागेश यादव पूर्वाश्रमीच्या दिपाली काशिनाथ चव्हाण हेळवाक कोयनानगर गावातील हायस्कूलमध्ये आठवीपर्यंतचे शिक्षण घेतले व काही वर्षांनी दिपाली यांना गायनाची आवड निर्माण झाली.
गावच्या मंदिरात तसेच लग्नाच्या कार्यक्रमात व सत्यनारायणाच्या पूजेला अभंग व गवळणी गीते म्हणायला जायला लागले. आई सुलोचना व वडील काशिनाथ यांच्या सहवासात लाडात वाढलेली दिपाली उपवर झाली व विवाह झाल्यानंतर कडवई येथील व्यावसायिक व सज्जन व धार्मिक वृत्ती असलेले गृहस्थ श्री नागेश बाबु यादव यांच्याबरोबर विवाहबद्ध एप्रिल 2008 मध्ये झाल्या.
संसारात रमता रमता पतीची उत्तम साथ व सासू-सासरे कुटुंबीय यांचे उत्तम सहकार्य लाभले. पुढे यादव वाडी येथील श्री ज्ञानेश्वरी भजन महिला मंडळ यांच्या भजनातून गायनाची संधी 2008 पासून मिळाली. या भजन महिला मंडळातील महिला प्रियांका यादव, रेखा यादव, ममता यादव संयुक्ता यादव, स्नेहा यादव, रचना तळेकर, नलिनी यादव, श्वेता यादव, आरोही यादव, कविता यादव, मानसी यादव इत्यादींची उत्तम साथ मिळाली व आजही ज्ञानेश्वरी भजन मंडळ मिळून विविध गावातून भजन गायली जात आहेत.

तसेच आरोग्य सेवेमध्ये आशासेविका म्हणून सोळा वर्ष कार्यरत आहेत.अनेक रुग्णांची चौकशी करून आपल्या सेवेत त्या नेहमीच प्रामाणिक राहिले आहेत.
सन 2018 पासून श्री गजानन महाराज मंदिर धामणी यादव वाडी या ठिकाणी होणाऱ्या जयंती पुण्यतिथी व शेगाव येथील पालखी दिंडी इत्यादी कार्यक्रमात विशेष सहभागी असून महिला भजन कार म्हणून संतांच्या ओव्या, भजने, दिंडीतील गीते गजर व हरिनामाचा जागर यामध्ये शेगाव संस्थांना पर्यंत श्री गजानन महाराज मंदिर धामणी यादव वाडी येथील मंदिराचे प्रमुख सेवेकरी श्री गोपीनाथ यादव यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे तेथ पर्यंत पोहोचण्याचे सौभाग्य प्राप्त झाले व सेवेची संधी धार्मिक व आध्यात्मिक कार्यातून प्राप्त झाली.
2020 पासून देवरुख चव्हाण आळी कांजीवरा येथील भगिनी सौ पूजा पराग चव्हाण यांच्या समवेत श्री संत सेना महाराज भजन महिला मंडळ देवरुख चव्हाण आळी यामध्ये भजनाच्या माध्यमातून विविध मंदिरे व धार्मिक कार्यक्रमातून भजन रुपी सेवेची संधी सध्या मिळते. देवरुख चव्हाण आळी येथील महिला सानिका चव्हाण, प्रीती चव्हाण, अमिषा चव्हाण, माधुरी धामणे, चव्हाण विमल, चव्हाण सानवी, चव्हाण मीना चव्हाण सांची यांची संत सेना महाराज महिला मंडळाच्या माध्यमातून उत्तम साथ लाभत आहे .
नम्रता यादव गेले काही वर्ष विश्व हिंदू परिषदेचे देखील कार्य करीत आहेत.याचबरोबर शिवणकाम वेगवेगळे पदार्थ बनवणे, केक तयार करणे, लोकरीच्या वस्तू, मायक्रोन च्या वस्तू बनवणे तसेच इतरांना मदत करायला त्यांना आवडते. या आवडी त्यांनी मनापासून जोपासल्या आहेत.लग्नात मंगल अष्टके गाणी ही त्यांची फेवरेट आवड आहे. प्रपंच, मुले, नोकरीची सेवा सांभाळून आदर्श आई-वडील यांनी दिलेले संस्कार तसेच संतांनी दिलेली अनमोल ठेव म्हणजे, भजन रुपी सेवा ही कलेच्या माध्यमातून मंजुळ व पहाडी आवाज व गोड गळा या स्वरूपाने जपले आहेत.

आदर्श नारी उत्कृष्ट महिला भजन कार व आरोग्य दामिनी कर्तव्यदक्ष सौ.नम्रता नागेश यादव या भजन सरितेच्या नवरात्र उत्सव निमित्त आनंदमय जीवनाचा व स्वभावाप्रमाणे नम्र व प्रेमळ असलेल्या नम्रतेच्या प्रगतीचा साठी व भावी वाटचाली साठी शुभेच्छा. भारतीय संस्कृतीची जपणूक व महाराष्ट्रातील संत, वांग्मय, अभंग वाणी, ग्रंथवाचन व संत सेना महाराजांचा आदर्श ही जपणूक होत आहे.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा
आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..
“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…

