
संगमेश्वर अर्चिता कोकाटे- संगमेश्वर येथील श्री निनावी देवी मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे नवरात्रोत्सव निमित्त ‘ अखंड हरिनाम सप्ताह ‘ उत्साहात संपन्न झाला. धार्मिक रूढी परंपरा या पद्धतीने भंडारी बांधव , तेली बांधव तसेच नाभिक, ज्ञाती बांधव व मित्रमंडळ या पद्धतीने ‘ अखंड हरिनाम सप्ताह ‘ मोठ्या थाटामाटात संपन्न केला गेला .
श्री. निनावी देवी प्रासादिक मंडळ यांच्या वतीने प्रतिवर्षी पारंपरिक पद्धतीने आयोजन केले जाते . मंडळाचे सदस्य सेवेत सक्रिय असतात . मंडळाचे अध्यक्ष (मानकरी) दत्ताराम (बावा ) सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्रीत विविध कार्यक्रम अत्यंत शांतता व सुव्यवस्था राखून संपन्न केले गेले . हा आगळावेगळा उत्सव , विविध गावातून आलेली भजने ,डबलबारी भजन , हरिपाठ ,भगिनी मंडळाची भजने , बाल व युवा बंधू / भगिनींची भजने , गवळणी आदींनी संपन्न झाला

हा महोत्सव श्रद्धा ,भक्ती ,सामाजिक ऐक्य व भक्त व भक्ती , भगवंत यांच्या सुरेख संगमाने संपन्न झाला . या उत्सवात संत व मंदिराचे पूर्वीचे मानकरी यांनी जपलेला पारंपरिकपणा याची सुप्रसिद्ध भजनकार व पत्रकारांनी प्रशंसा केली. मंगळवारी महाप्रसाद होऊन कार्यक्रम संपन्न झाला. भक्तांनी भक्तीचा आनंद लुटला. मातेच्या दिव्यत्वाचा ऊर्जा,चैतन्यमय वातावरण व शक्तीने संगमेश्वर नगरी धन्य झाली.शाश्वत जीवनासाठी संरक्षण,संवर्धन इ. चा निनावी देवीचा जागर करण्यात आला .


सर्व ग्रामस्थ, बाळ- गोपाळ यांना खेळीमेळीच्या व प्रसन्नमय वातावरणात सर्वांना बरोबर घेऊन महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याचे अध्यक्ष बावा सुर्वे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले तसेच पोलिस ठाणे संगमेश्वर यांचे उत्तम सहकार्य लाभल्याचे म्हणाले.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा
आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..
“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…

