ग्रामदेवता मंदिर पिरंदवणे येथे नवरात्रोत्सव उत्साहात संपन्न…!

Spread the love

शिरगाव, चिपळूणचे ह.भ.प. मनोहर महाराज धांगडे यांचे सुश्राव्य वारकरी कीर्तन; ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती..!

जनशक्तीचा दबाव न्यूज | पिरंदवणे | ऑक्टोबर २४, २०२३.

संगमेश्वर तालुक्यातील पिरंदवणे येथे ग्रामदेवता महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला. घटस्थापनेला देवतांना रूपे लावण्यात आली. यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम व नित्य पुजा-अर्चा व दैनंदिन कार्यक्रम संपन्न झाले.

शुक्रवार दि.  ऑक्टोबर रोजी चिपळूणजवळील शिरगाव येथील ह.भ.प. श्री. मनोहर महाराज धांगडे यांचे सुश्राव्य वारकरी कीर्तन आयोजित करण्यात आले होते. तत्पूर्वी संध्याकाळी हरिपाठ व त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. गावात प्रथमच वारकरी संप्रदायाचे कीर्तन होत असल्याने महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे निरुपण करत आध्यात्मिक मार्गातून मानवी स्वभावाच्या पाकळ्या उलगडून सांगितल्या. ‘चांगली माणसे शोधण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा स्वतः चांगुलपणा समाजात प्रसृत करा; लोकच तुमचा शोध घेतील’ असा संदेश त्यांनी आपल्या विवेचनातून दिला. तसेच भक्तीमार्गाबाबत विविध उदाहरणे देत त्यांनी आपला विषय उपस्थितांसमोर मांडला.

ग्रामदेवता ट्रस्टच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासाठी गावचे मानकरी श्री. अरविंद मुळे, श्री. मिलिंद जुवेकर, सरपंच श्री. विश्वास घेवडे, ग्रामपंचायत सदस्य श्री. प्रकाश गमरे, मंदिर व्यवस्थापन समिती सदस्य, गावकरी, प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला.  

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page