नवनिर्माण महाविद्यालय , लोवले संगमेश्वर येथील शैक्षणिक संकुलात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात..

Spread the love

*दीपक भोसले/संगमेश्वर-* नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या भाई हेगशेट्ये कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय तसेच नर्सिंग महाविद्यालय लोवले संगमेश्वर येथे जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने वृक्षवाटप आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. संजना चव्हाण आणि नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. प्रज्ञा कदम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना भावनिक व प्रेरणादायी संदेश दिले.

“पर्यावरणाचे संरक्षण करणे ही काळाची गरज असून, आरोग्यदायी जीवनासाठी सुदृढ पर्यावरण अत्यावश्यक आहे,” असे प्रतिपादन प्राचार्यांनी केले. त्यांनी असेही सांगितले की, “फक्त पर्यावरण दिनापुरतेच नव्हे, तर दररोज आपण निसर्गाशी नाते जोडले पाहिजे. निसर्ग सुंदर ठेवणे, हेच आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.”कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्यावरणाच्या संरक्षणाचा संकल्प करत कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page