🛑 जनशक्तीचा दबाव न्यूज | रत्नागिरी | जानेवारी ३०, २०२३.
◼️ गोगटे जोगळेकर कॉलेज मधील नौदल एन.सी.सी.विभागातील छात्र सिनियर कॅडेट कॅप्टन सौरभ लघाटे नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील कॅम्पमध्ये सहभागी झाला होता.
◼️ सौरभ लघाटे हा महाविद्यालयात तृतीय वर्ष इंग्रजी विभागात अध्ययन कार्य करणाऱ्या या छात्राने एन.सी.सी विभागातील आपली सर्व कर्तव्य पार पडत असताना स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध कॅम्प पूर्ण केले आहेत.
◼️ सौरभ लघाटे याने ओव्हरसीज डिप्लॉयमेंट हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील कॅम्प देखील पूर्ण केला आहे. आरवली या गावातील या गुणवंत छात्राने नाशिक, पुणे, आणि कोल्हापूर येथील सर्व खडतर असे प्री-आरडी कॅम्प पूर्ण करून शिप मॉडेलिंग या इव्हेंटच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिन परेडमध्ये सहभागी होण्याचा सन्मान प्राप्त केला आहे. या छात्राला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रफुल्लदत्त कुलकर्णी आणि ०२ महाराष्ट्र नेव्हल एन.सी.सी.चे कमांडिंग ऑफिसर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.