
कर्जत(नेरळ): सुमित क्षीरसागर
लोकनेते सुधाकरशेठ घारे यांच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील मोठ्या प्रमाणात विकास निधी आणून विकासकामे केली जात आहेत, तसेच तरुणांना भेडसावणारे अनेक प्रश्न सुधाकरशेठ घारे व प्रमुख पदाधिकारी यांच्या माध्यमातून सोडविले जात आहेत. सुधाकरशेठ घारे तरुणांसाठी प्रमुख आकर्षण झाले आहेत.




मौजे नेरळ-मोहाचिवाडी येथील रवी सोनी, महेश चव्हाण,विकी फाळे, योगेश धनवटे, साहिल गायकवाड, श्रेयश पवार, नदीम खान, अनुराग आढाव, गणेश जाधव,अशोक जाधव, ओमकार बागुल, स्वप्नील वळवे, जयेश भोईर, अक्षय पवार, तेजस जाधव, विष्णू दास, कैलास मुकणे, राहुल राणे, सुनील पवार, कैलास शिंगे, सुनील गायकवाड, तन्मय वाघमारे, रोहन चव्हाण यांनी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश केला. याप्रसंगी उपस्थित प्रमुख मान्यवर भगवान शेठ चंचे, भरत भाई भगत, शिवाजी शेठ खारीक, गणेश खराटे, प्रीतम गोरी, जयेश कालेकर, रोहित चंचे आदी मान्यवर उपस्थित होते.
