
*मंडणगड (प्रतिनिधी) :* केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत दि. 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’मोहिम राबविण्यात आली. या मोहिमे अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विस्तार विभाग यांच्या वतीने करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून व राष्ट्रीय सेवा योजना दिनाचे औचित्य साधून ‘‘आपला परिसर स्वच्छ परिसर’ या विषयावर आधारीत भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. भित्तीपत्रकाचे उद्घाटक म्हणून संस्थेच्या अध्यक्षा सौ. संपदाताई पारकर उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे कार्याध्यक्ष मा. श्री. श्रीराम इदाते उपस्थित होते. यावेळी संस्थेचे सहकार्यवाह श्री. विश्वदास लोखंडे, कोशाध्यक्ष श्री. रविंद्रकुमार मिश्रा, संचालक श्री. आदेशजी मर्चंडे, श्री. वैभव कोकाटे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये, कार्यक्रमाधिकारी प्रा. संदीप निर्वाण, डॉ. संगीता घाडगे, प्रा. शरीफ काझी, डॉ. महेश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संगीता घाडगे यांनी करुन कार्यक्रमाविषयी थोडक्यात माहिती सांगितली.
त्यानंतर संस्थेच्या आध्यक्षा सौ. संपदाताई पारकर यांच्या हस्ते भित्तीपत्रकाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत राबविला जाणारा हा उपक्रम खरोखरच स्तुत्य असून अशाच प्रकारचे उपक्रम राबवून व समाजामध्ये जावून त्याची जागृती करणे आवश्यक असल्याचे सांगून सदर उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमेतंर्गत महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने बस स्थानक स्वच्छता, भीतीपत्रक प्रकाशन, निबंध स्पर्धा, एन. एन. एस. स्थापना दिवसा निमित्त डॉ. व्ही. एम. पातंगे यांचे ऑनलाईन व्याख्यान, महाविध्यालय परिसर स्वच्छता, वृक्षारोपण, तसेच स्वच्छतेची शपथ हे सर्व उपक्रम राबवून ‘स्वच्छता पांधरवडा’ साजरा करण्यात आला.
सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, उपप्रचार्य व उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली एन. एस.एस. कार्यक्रमाधिकारी प्रा. संदीप निर्वाण, प्रा. शरीफ काझी व एन. एस. एस. प्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले. शेवटी डॉ. संगीता घाडगे यांनी सर्वांचे आभार मानले.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*
*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*
*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*
*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…*





