
▪️भारताच्या लोकशाही समाजात स्वतंत्र आणि जबाबदार पत्रकारांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 16 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा केला जातो. या दिवशी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने एक नैतिक निरीक्षक ( वॉचडॉग) म्हणून काम करण्यास सुरुवात केली. जेणेकरून माध्यमांचा उच्च दर्जा राहील. माध्यमे कोणत्याही प्रभावानं किंवा धमकावण्यानं बाधित होणार नाही.
🔹️इतिहास :
▪️1956 मध्ये, पहिल्या प्रेस कमिशननं असं निरीक्षण केलं की पत्रकारितेमध्ये व्यावसायिक नैतिकता राखण्याचा सर्वोत्तम मार्ग वैधानिक प्राधिकरण संस्था तयार करून साध्य केला जाऊ शकतो. यामध्ये प्रामुख्यानं मीडिया उद्योगाशी संबंधित लोकांचा समावेश असेल. यातून 1966 साली प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचा जन्म झाला. तेव्हापासून, 16 नोव्हेंबर 1966 हा दिवय भारतीय प्रेस कौन्सिलच्या स्थापनेच्या स्मरणार्थ राष्ट्रीय पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.
🔹️पत्रकारितेतील उत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार :
▪️16 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकार दिन हा देशातील जबाबदार आणि स्वतंत्र माध्यमाचं प्रतीक आहे. या दिवशी विविध कार्यक्रमांमध्ये पत्रकारितेतील उत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. यावेळी स्मरणिकेचे प्रकाशनही केलं जातं. 2012 पासून विविध क्षेत्रात मुद्रित माध्यमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.
देशातील महान सुधारणावादी पत्रकारांच्या सन्मानार्थ ‘राजा राम मोहन रॉय नॅशनल अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन जर्नालिझम’ हा पुरस्कार दिला जातो. या अंतर्गत 1 लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याशिवाय ठरलेल्या क्षेत्रात दरवर्षी पन्नास हजार रुपये पुरस्कार दिले जातात. प्रत्येकाला एक प्रशस्तीपत्र दिलं जातं. प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ज्युरी/कौन्सिल द्वारे निवडलेल्या पत्रकारांना विविध क्षेत्रात त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित केलं जातं.
🔹️2023 ची थीम जाहीर :
▪️राष्ट्रीय पत्रकार दिन 2023 ची थीम प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने जाहीर केली. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियातर्फे विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन उपाध्यक्ष श्री जगदीप धनखर यांच्या हस्ते होणार आहे.
🔸️2023 : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात मीडिया (Media in the Era of Artificial Intelligence)
🔸️2022 : राष्ट्र उभारणीत माध्यमांची भूमिका (Role of Media in Nation Building)
🔸️2021 : डिजिटल वेढा अंतर्गत पत्रकारिता (Journalism under Digital Siege)
🔸️2020 :लोकहित म्हणून माहिती (Information as a Public Good)
▪️राष्ट्रीय पत्रकार दिन हा लोकशाहीच्या तत्त्वांचे पालन करण्यासाठी माध्यमांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचं स्मरण करण्याचा दिवस आहे
▪️एक मुक्त आणि निःपक्षपाती माध्यम कोणत्याही लोकशाही व्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून काम करते, ज्यामुळं नागरिकांना याेग्य माहितीपर्यंत पोहोचता येते.
▪️भारतामध्ये, देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात आणि लोकशाही राष्ट्र म्हणून त्यानंतरच्या प्रवासात माध्यमांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
▪️लोकांवर होणारा कोणताही अन्याय उघड करणं अन् व्यवस्थेतील त्रुटी उघड करणं हे माध्यमाचं ध्येय आहे.