![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2024/01/fb_img_17067075853321899248566380799367.jpg)
नागपूर : – नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमी येथून आज बुधवारी ओबीसी जनजागर रथ यात्रेला सुरुवात झाली. ३१ जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान ही यात्रा जनजागृती करणार आहे. राष्ट्रीय ओबीसी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही मात्र, आमच्या हक्काचे देण्यास आमचा विरोध आहे. ओबीसींच्या विविध मागण्यांसह जातनिहाय जनगणना करून त्याआधारे ओबीसींना आरक्षण देण्यात यावे, ही प्रमुख मागणी या यात्रेच्या माध्यमातून असणार आहे. आमच्या ताटात वाढलेलं इतरांना देण्यात येऊ नये, ही भूमिका ओबीसी समाजाची आहे.
देशभरात ६० टक्के असलेल्या ओबीसी समाजाला तुटपुंजे आरक्षण असल्याने जातनिहाय जनगणना करून जनगणनेच्या आधारे आम्हाला आरक्षण देण्यात यावं, यासह विविध मागण्या घेऊन आजपासून या रथयात्रेला सुरुवात झाली आहे. जिल्हाभर ही यात्रा लोकांना जागृत करेल आणि ५ फेब्रुवारीला कामठी येथे महासभा पार पडून यात्रेचा समारोप होणार असल्याची माहिती उज्वला बोढारे, जिल्हा प्रभारी ओबीसी महासंघ यांनी दिली.
दरम्यान, ५ फेब्रुवारीपासून ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी महाएल्गार यात्रा निघणार आहे. अलीकडेच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत डॉ. बबनराव तायवाडे यांना निमंत्रण नव्हते. वडेट्टीवार यांनी त्यांचा फोन नॉट रीचेबल होता, आम्ही सोबतच असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. मागासवर्ग सर्व्हेक्षण मुदत ३१ जानेवारीपासून आता २ फेब्रुवारीपर्यंत वाढविली आहे. एकंदरीत मराठा समाज पाठोपाठ आता ओबीसी समाजातही हक्काचा लढा तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.जा
जाहिरात
![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2024/01/img-20240131-wa00614965349404253326220.jpg)
![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2024/01/img-20240131-wa0029221943519212207551.jpg)
![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2024/01/img-20240131-wa0056737734724859172570.jpg)
![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2024/01/img-20240130-wa00272335914839845575613.jpg)
![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2024/01/screenshot_2024_0110_0914023727446957243379340.jpg)