नरेंद्र मोदी कडक घरगुती नियमांनी पाळतात नवरात्रीचं व्रत, या दिवसांत असतं विषेश डाएट, फक्त खातात ‘हे’ खास पदार्थ….

Spread the love

*गेल्या अनेक वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस उपवास करत आहेत. या काळात ते कठोर नियमांचे पालन करतात. काही महिन्यांपूर्वी, अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन यांच्याशी झालेल्या विशेष संभाषणात पंतप्रधान मोदींनी नवरात्रीचा उल्लेख केला होता.*

*नवी दिल्ली-* प्रतिनिधी प्रत्येक सणामागे काहीतरी दडलेलं तत्त्वज्ञान असतं. आता नवरात्र सुरु आहे आणि नवरात्रीचे उपवास सुद्धा! काही लोक हे उपवास केवळ परंपरेपोटी पाळतात, तर काहींच्या जीवनशैलीत ते खोलवर रुजलेलं असतं. आपल्या आसपास बघितलं तर अनेक जण अशा काळात शारीरिक आणि मानसिक शिस्त राखण्यासाठी खास पद्धती वापरताना दिसतात. हे दिवस त्यांच्यासाठी केवळ श्रद्धेचा भाग नसतात तर जीवनाचा एक गूढ शास्त्रशुद्ध अनुभव ठरतो. काहींसाठी तो अध्यात्माचा मार्ग असतो, तर काहींसाठी आत्मसंयमाचा सराव. या काळात केलेली साधना केवळ मनाला नाही तर शरीरालाही एक वेगळी ताकद देते.

आधुनिक जीवनाच्या गोंगाटात, कामाच्या व्यापातही काही लोक असे काटेकोर नियम पाळतात आणि त्यातून एक वेगळी ऊर्जा मिळवतात. असेच एक व्यक्ती म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होय. उपवासाचा त्यांचा अनुभव ऐकला की लक्षात येतं की उपवास म्हणजे फक्त न खाणं नसून, ती एक संपूर्ण साधना आहे.,आता पाहूया, या काळात ते कोणते नियम पाळतात आणि त्याचा त्यांच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो.

*शरीर शुद्धीचा टप्पा*

​उपवास सुरू करण्याआधी शरीराला आतून शुद्ध करणे ही मोदींची पहिली पायरी असते. योग आणि आयुर्वेदाच्या साहाय्याने पचनसंस्था व इतर अंतर्गत यंत्रणा संतुलित केल्या जातात. त्यामुळे शरीर जडत्व, अपचन किंवा थकवा टाळून उपवासासाठी तयार होतं. ही पद्धत फक्त आहार रोखण्यापुरती नसून, ती शास्त्रीय दृष्टीकोनातून शरीराला डिटॉक्स करण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा शरीर स्वच्छ आणि हलकं होतं तेव्हा उपवास अधिक परिणामकारक ठरतो.

*पाण्याचे महत्त्व*

​उपवास सुरू करण्याआधी मोठ्या प्रमाणावर पाणी पिण्यावर मोदींचा भर असतो. हे पाणी शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यास मदत करतं. यामुळे शरीरातील उष्णता संतुलित राहते आणि उपवासाच्या दिवसांत डिहायड्रेशनचा त्रास होत नाही. या सवयीमुळे मनाची एकाग्रता टिकून राहते. अनेकदा लोक उपवासाच्या काळात सुस्ती जाणवते असं सांगतात, पण पुरेसं पाणी घेतल्याने ती अडचण टळते.

*अनुशासन आणि आत्मसंयम*

मोदींसाठी उपवास म्हणजे केवळ अन्नत्याग नाही, तर एक शिस्त आहे. बाहेरच्या कामकाजात ते कितीही व्यस्त असले तरी अंतर्मनात ते शांत, स्थिर राहतात. उपवासाच्या दिवसांत मिळणारी आत्मशांती त्यांना एक वेगळी ऊर्जा देते. बाहेरच्या कार्यात ते कधीच मागे हटत नाहीत, उलट जास्त परिश्रमही करतात. या शिस्तीमुळे शरीर थकलेलं असलं तरी मन अधिक जोशपूर्ण राहतं.

*पहिल्या अनुभवाची शिकवण*

उपवासाची प्रेरणा नरेंद्र मोदींना बालपणी मिळाली. शालेय वयात देशभरात एक दिवसाचा उपवास आयोजित केला गेला होता. त्या दिवशी भूक न लागण्याचा आणि एका नव्या चेतनेचा अनुभव त्यांना आला. तेव्हापासून उपवास ही फक्त धार्मिक गोष्ट नाही तर विज्ञान आहे, अशी जाणीव त्यांनी स्वतःला करून दिली. नंतर हळूहळू हा अनुभव त्यांनी आपल्या जीवनात शिस्तीच्या रूपात रूजवला.

*मानसिक स्पष्टता आणि कार्यक्षमता*

उपवासाच्या काळात नरेंद्र मोदी विचार अधिक सहज आणि स्पष्टपणे व्यक्त करू शकतात. अनेकदा त्यांना जाणवतं की कल्पना मनात अनपेक्षितपणे येतात. वर्षा ऋतूत ते पचनशक्ती कमी असल्यामुळे दिवसातून फक्त एकदाच आहार घेतात. ही सवय मेंदूला आणि मनाला अधिक स्पष्टता देते. त्यांच्या मते, उपवास म्हणजे शरीराच्या तसेच विचारशक्तीच्या शुद्धीची एक प्रक्रिया आहे, जी माणसाला अधिक कार्यक्षम आणि एकाग्र बनवते.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t  कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*

*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*

*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी  7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*

*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav  वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page