नारायण राणे यांचं केंद्रीय मंत्रिपद अवघ्या दोन महिन्यात जाणार-वैभव नाईक

Spread the love

सिंधुदुर्ग : कोकणात ठाकरे गट आणि राणे कुटुंबीयांची चांगलीच जुंपल्याचं दिसून येत आहे. दोघांकडून एकमेकांवर कडाडून टीका केली जात आहे. कधी नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत तर कधी वैभव नाईक विरुद्ध नितेश राणे यांच्यातील शाब्दिक चकमक होताना दिसते.अशातच आता ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी थेट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लक्ष केलं आहे. नारायण राणे यांचं केंद्रीय मंत्रिपद अवघ्या दोन महिन्यात जाणार असल्याचं वैभव नाईक यांनी म्हंटलं आहे. वैभव नाईक यांच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नाईक यांच्या या विधानामुळे कोकणात पुन्हा एकदा नारायण राणे यांचं मंत्रिपद जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.भाजपला राणेंची राजकीय दृष्टया गरज नाही. त्यामुळं राणेंना राजीनामा द्यावा लागणार असल्याचं वैभव नाईक यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे नारायण राणे यांचं मंत्रिपद जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. नाईक यांनी राणेंचं मंत्रिपद का जाणार याचं कारणही यावेळी त्यांनी सांगितलं आहे. वैभव नाईक यांच्या या विधानावर भाजपकडून किंवा नितेश राणे, निलेश राणे यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रीया आली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page