“माझ्या नादी लागू नका, नाहीतर पुण्यात येऊन…”, नारायण राणेंचा अजित पवारांना थेट इशारा!

Spread the love

सिंधुदुर्ग : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अलीकडेच भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टोलेबाजी केली होती. ज्या ज्या नेत्यांनी शिवसेना सोडली, ते सर्व नेते निवडणुकीत हरले आहेत. नारायण राणे हे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले होते, ते तर दोनवेळा निवडणुकीत हरले. वांद्रे येथे तर एका बाईने नारायण राणेंना हरवलं, अशी टोलेबाजी अजित पवारांनी केली.
अजित पवारांच्या या टोलेबाजीला नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
यावेळी अजित पवारांच्या टीकेबाबत विचारलं असता नारायण राणे म्हणाले की, अजितदादाला बारामतीच्या बाहेर कितपत राजकारण कळतं, हे मला माहीत नाही. खरं म्हणजे मला त्याच्याबद्दल बोलायचंच नाही. तो ज्याप्रकारचा राजकारणी आहे, त्याबद्दल बोलूच नये. बारामतीच्या बाहेर त्याने दुसऱ्यांचे बारसे घालायला जाऊ नये. दुसऱ्यांना नावं ठेवू नये. “माझ्या फंद्यात पडू नका, नाहीतर मी पुण्याला येऊन बारा वाजवेन…” असा थेट इशारा नारायण राणेंनी दिला.
नारायण राणे पुढे म्हणाले, “माझं पहिलं कार्यक्षेत्र मुंबई आहे. पण बाळासाहेब ठाकरेंनी मला कोकणात पाठवलं. तिकडून मी सलग सहा वेळा निवडून आलो. त्यानंतर काँग्रेसमध्ये असताना सोनिया गांधींनी मला वांद्रे येथून निवडणूक लढवण्यास सांगितलं. त्यांच्या म्हणण्यानुसार मी निवडणुकीसाठी उभा राहिलो. मी माझ्या मतदारसंघात उभा राहिलो नव्हतो. पण महिला असो वा पुरुष असो… उमेदवार हा उमेदवार असतो.”

२०१५ मध्ये शिवसेना आमदार बाळा सावंत यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेनं तृप्ती सावंत यांना तिकीट दिलं. तेव्हा त्यांच्याविरुद्ध नारायण राणे यांनी मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेला पराभूत करण्याची घोषणाच केली होती. मात्र, त्यांना २० हजार मतांनी तृप्ती सावंत यांच्याकडून पराभूत व्हावं लागलं होतं. यानंतर २०१९मध्ये मात्र शिवसेनेनं तृप्ती सावंत यांना उमेदवारी नाकारल्यामुळे सावंत यांनी बंडखोरी करत भाजपामध्ये प्रवेश केला. शिवसेनेने तिथे मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली होती. मात्र, काँग्रेसच्या झिशान सिद्दिकी यांनी त्यांचा पराभव केला.

जाहिरात :

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page