
अशातच विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narahari Zirawal) अचानक नॉट रिचेबल झाले आहेत. तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील आपल्या पूर्वनियोजित दौऱ्यावर गेले आहेत.
मुंबई ,11 मे 2023- विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ अचानक गायब; चर्चांना उधाण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून राज्यात ठाकरे विरुद्ध शिंदे असा (Maharashtra Political crisis) सत्तासंघर्ष सुरु झाला आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेल्या या सत्ता संघर्षाचा गुरुवार ११ मे रोजी अंतिम निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार राहणार की पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहीलं आहे.
अशातच विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narahari Zirawal) अचानक नॉट रिचेबल झाले आहेत. तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील आपल्या पूर्वनियोजित दौऱ्यावर गेले आहेत. एकीकडे सत्तासंघर्षाचा निकाल (Maharashtra Political crisis) असतांना दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष गायब असल्याने चर्चांना उधाण आले आहे.
झिरवळ (Narahari Zirawal) यांचे दोन्ही फोन फोन लागत नसून ते त्यांच्या गावी देखील नाहीत. त्यामुळे झिरवळ गेले तरी कुठे? असा प्रश्न केला जात आहे. सत्ता संघर्षावर दुपारी १२ च्या आत निकाल (Maharashtra Political crisis) लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असं असताना झिरवळ नॉट रिचेबल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.