
*पुणे-* पुण्यातील स्वारगेट एसटी बस आगारामध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून फरार झालेला दत्ता गाडे अजूनही पोलिसांच्या हाताला लागला नाही. दत्ता गाडेचं लोकेशन सापडल्यानंतर पुणे पोलिसांचा फौजफाटा, डॉग स्कॉड पथक आणि संपूर्ण यंत्रणेनं त्याच्या गावात शोध घेतला पण संध्याकाळपर्यंत तो काही हाती लागला नाही. त्यामुळे दत्ता गाडेचा उद्याही शोध सुरूच राहणार आहे.
स्वारगेट बस आगारमध्ये एका २६ तरुणीवर बलात्कार प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरून गेला. या प्रकरणाला नराधम दत्ता गाडे आपल्या गावी पळून गेला होता. त्याच्याबद्दल धक्कादायक खुलासे झाले. मोबाईलच्या लोकेशनवरून पोलिसांनी त्याचा माग काढला. आज सकाळपासून शिरुर तालुक्यातील गुणाट गावातील शेतशिवारात आरोपी मुक्कामी असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर १०० पोलीस, ड्रोन कॅमेरे आणि डॉग स्कॉडसह पोलीस दल गावात पोहोचलं. तब्बल ५० पेक्षा जास्त तास होऊनही आरोपीचा पोलिसांना थांगपत्ता लागलेला नाही. आता शिरूर तालुक्यात थेट १०० पोलिसांच्या ताफ्याची गाडी दाखल झाली आहे.
आरोपी गाडे हा उसाच्या शेतात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उसाच्या शेतातही पोलिसांची शोध मोहीम सुरु आहे. गाडेला शोधून काढणे हे पोलिसांसमोर आव्हानच राहिले आहे. ज्या ठिकाणी आरोपी दत्ता गाडे याला शेवटचं पाहिलं होतं. इतकच नाही तर याच घरात आरोपीने पाणी देखील प्यायला असल्याची माहिती समोर आली आहे. पाणी पिल्यानंतर आरोपी या ठिकाणी काही काळ थांबला आणि त्यानंतर बेपत्ता झाला अशी माहिती काही गावकऱ्यांनी दिली आहे. दरम्यान आरोपीला पकडण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथकं आधीच रवाना करण्यात आली आहे. यातील काही पथक आरोपीच्या गुणाट या गावात ठाण मांडून बसली आहेत. या गावातील प्रत्येक ठिकाणी आरोपीचा शोध घेतला जातो. पोलिसांच्या मदतीला श्वानपथक देखील आहे. या पथकाच्या माध्यमातून आरोपीचा माग काढण्याचं काम पोलीस करताना दिसतात.