दापोली शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – नाम. योगेश कदम…

Spread the love

*दापोली :* दापोली शहराच्या विकासाचा मागास राहिलेला विकासाचा अनुशेष अत्यावश्यक ती विकास कामे करून या पुढील काळात भरुन काढला जाईल. त्या साठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशाप्रकारचे अभिवचन नाम. योगेशदादा कदम यांनी दापोली येथे बोलताना शहरवासीयांना दिले. दापोली नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक बुधवारी २८ मे रोजी पार पडली या निवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या दापोली नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा कृपा शशांक घाग यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा पदभार हा महाराष्ट्र राज्याचे गृह ( शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी २९ मे रोजी स्वीकारला.

आनंदी वातावरणातील उत्साहात पार पडलेल्या नगराध्यक्ष पदाच्या पदभार सोहळा कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव रोडगे , उपनगराध्यक्ष खालीद रखांगे, सर्व नगरसेवक तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, उपजिल्हा प्रमुख सुधिर कालेकर , विधानसभा संघटक प्रदिप सुर्वे , विधानसभा क्षेत्राध्यक्ष किशोर देसाई , तालुका प्रमुख उन्मेष राजे, तालुका संघटक प्रकाश कालेकर , माजी समाज कल्याण समिती सभापती भगवान घाडगे,महिला आघाडी संघटीका दिप्ती निखार्गे, शहर प्रमुख प्रसाद रेळेकर, शहर संघटीका रसिका पेटकर युवती शहर संघटीका किर्ती परांजपे आदींसह शहरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी या मतदार संघाचे आमदार आणि राज्याचे गृह ( शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना दापोली शहराच्या विकासाचा मागास राहिलेल्या विकासाचा अनुशेष भरून काढला जाईल त्यात प्रामुख्याने नळ पाणीपुरवठा योजनेला प्रथम प्राधान्य दिले जाईल असे सांगितले. दापोली नगर पंचायतीचे महायुतीचे सर्व नगरसेवक हे अभ्यासू नगरसेवक आहेत. ते त्यांना म्हणावे तसे यश येत नव्हते.

आता महायुती म्हणून शिवसेनेच्या नगराध्यक्षा कृपा घाग नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्या आहेत त्यांना नगराध्यक्ष म्हणून दिड पावणेदोन वर्षे कालावधी मिळेल मागची उणीव भरून काढू आणि शहराच्या विकासासाठी प्रयत्न सार्थकी लावू. आपण गेल्या ३ वर्षात नगर पंचायतीत पाऊल ठेवले नव्हते. दापोली मतदार संघातील ग्रामीण भागात आपली मजबूत पकड आहे मात्र दापोली शहर त्याला अपवाद होता. आता महायुतीच्या माध्यमातून सर्व नगरसेवकांनी विकास कामांना साथ देण्याचा निर्णय घेतला . या निर्णयामुळे महायुती शिवसेनेच्या नगराध्यक्ष कृपा घाग विराजमान झाल्या आहेत. त्यामुळे विकास कामे करताना काहिच अडचण येणार नाही. येथील लोकप्रतिनिधी म्हणून दापोली शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. त्यामुळे आवश्यक ती विकास कामे होण्यास अडचण येणार नाही असे सरतेशेवटी नाम. योगेशदादा कदम म्हणाले

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page