राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतूले यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश
▪️खान्देश व विदर्भातील नागरिकांना कोकणात जाण्यासाठी दैनिक व नियमित ०११३९/०११४० नागपूर मडगाव गोवा (शिर्डी मार्गे) प्रतिक्षा एक्स्प्रेस सुरु करण्याची मागणी श्री.वैभव मनोज बहुतूले राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना,शेगांव राष्ट्रीय सरचिटणीस-सल्लागार यांनी रेल्वे प्रशासन व मंत्रालयाकडे सतत लाऊन धरली होती. सदर गाडी ही आठवड्यातून केवळ दोनदाच धावत होती. सुरुवातीला हि गाडी प्रायोगिक तत्वावर चालविण्यात आली. परंतु या गाडीला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद बघता दोन ते तीन महिन्याकरिता वारंवार मुदतवाढ देण्यात आली होती. विदर्भ खान्देश व कोकण प्रांतात प्रवाशी व मालवाहतुकीच्या दृष्टीने दळणवळणासाठी ही गाडी अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे ही गाडी दररोज व नियमित चालविण्यात यावी याकरिता प्रवाशांकडून वारंवार मागणी होत होती.
▪️यासाठी रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था, कल्याण- सावंतवाडी (रजि) यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रावसाहेब दानवे (केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री), नितीन गडकरी (केंद्रीय रस्ते वाहतूक ,सडक महामार्ग राजमार्ग दळणवळण परिवहनमंत्री), रेल्वे बोर्ड अध्यक्ष, नवी दिल्ली,संयुक्त निर्देशक, कोचिंग रेल्वे बोर्ड नवी दिल्ली,.उप निर्देशक कोचिंग रेल्वे बोर्ड, नवी दिल्ली यांच्याकडे वारंवार ही मागणी लाऊन धरली होती.
▪️जन शिकायत कार्यालय मुंबई, रावसाहेब पाटील दानवे रेल्वे राज्यमंत्री,भारतीय रेल्वे यांच्याकडे वैभव मनोज बहुतूले राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना, शेगांव यांनी केलेल्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. यासंदर्भात सदर ०११३९/०११४० नागपूर मडगाव गोवा प्रतिक्षा एक्स्प्रेस दररोज चालविण्या संदर्भात कृती करण्याचे आदेश जन शिकायत कार्यालयाकडून मध्य रेल्वे प्रशासनास नुकतेच मिळाले आहेत.