*मुंबई :* देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदाचा शब्द पाळला नाही हे खरे आहे, माझी पार्टी लहान आहे. कारण तुम्ही मोठी होऊ देत नाही. पार्टी मोठी आम्ही तुमची करतो, असं म्हणत रामदास आठवले यांनी भाजपवर टीका केली आहे.
रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषद घेतली . यात त्यांनी भाजपवर टीका केली आहे. यावेळी रामदास आठवले म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदाचे आश्वासन दिले होते. पण पाळले नाही. केंद्रीय नेतृत्वात अमित शाह यांच्याशी बोललो होतो. एमएलसी आणि मंत्रिपद मिळावे ही मागणी होती. फडणवीस यांच्याशी बोला असे म्हटले होते. देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळला नाही. माझ्यासोबत कार्यकर्ते महायुतीसाठी काम करत राहिले. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळला नाही हे खरे आहे. माझी पार्टी लहान आहे. कारण तुम्ही मोठी होऊ देत नाही. पार्टी मोठी आम्ही तुमची करतो, असं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली आहे.
महायुतीसोबत आम्ही आहोत ही आमची नैतिक जबाबदारी आहे. आजच्या शपथविधीला मला बोलावले नाही. महादेव जानकार यांना कॅबिनेट दर्जा दिला होता. धनगर समाजाने मोठं मत दिले आहे. मी केंद्रात मंत्री आहे. त्यामुळे बाहेर पाडण्यात अर्थ नाही असे रामदास आठवले म्हणाले .