
*संगमेश्वर: अर्चिता कोकाटे/ नावडी-* 75 वर्षाची परंपरा जपणारे कसबा येथील गणेश कला मंदिरात आजही 350 मूर्ती तयार होतात. ज्येष्ठ नागरिक व कलाकार श्री. मुरलीधर बोरसुतकर गुरुजी यांचे वडील कै.विठ्ठल लक्ष्मण बोरसुतकर 1952 साली निवर्तले. या अगोदर ते गणपती काढायचे.
वडील गेल्यानंतर 1974 पासून शृंगारपूर येथे काही वर्ष गणपती काढले. त्यावेळेस गणपतीची संख्या कमी होती. त्यानंतर 1978 सालापासून कसबा येथील आपल्या घरी शाडूच्या मातीच्या गणेश मूर्ती काढू लागले.



साधारणतः मे महिन्यापासून ते गणपतीच्या माती कामाचा आरंभ करतात. एक फुट पासून तीन ते चार फुटापर्यंत त्यांच्या कारखान्यात मूर्ती आहेत. त्यामध्ये घोड्यावर बसलेला गणपती, फुलातील गणपती, उंदरावर बसलेला गणपती, दगडूशेठ हलवाई, लालबागचा राजा अशा विविध आकर्षक मूर्ती त्यांनी यावर्षी तयार केल्या आहेत.
यावर्षी गणपतीचा सण हा 27 ऑगस्ट पासून सुरू होत असल्यामुळे कारखानदारांची कमी कालावधीमध्ये गणपती काढण्याच्या कामाची लगबग दिसून येत आहे.
एकूणच 75 वर्षाची गणपती काढण्याची परंपरा श्री. मुरलीधर बोरसूतकर गुरुजी जपत आहेत.
या कलेतूनच बोरसुतकर गुरुजी यांचा कलाविष्कार दिसून येतो.