मुंबई : प्रतिनिधी (प्रणिल पडवळ)
चेंबूर येथील महर्षी दयानंद सरस्वती मार्गावरील पदपथावर उभारण्यात आलेल्या स्टॉल्समुळे मोठा अडथळा निर्माण होत होता. पदपथावरील या अतिक्रमणामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता एम पश्चिम विभागाने धडक कारवाई करत या मार्गावरील पदपथ अतिक्रमण मुक्त केले. या स्टॉल्समधून खाऊच्या वस्तूंची विक्री केली जात होती.
महानगरपालिकेच्या एम/पश्चिम या चेंबूर येथील महर्षी दयानंद सरस्वती मार्ग अर्थात सेंट्रल अव्हेन्यू रस्त्यावरील एचडीएफसी बॅंकेसमोरील पदपथावर खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल्स मागील चार वर्षांपासून बनवण्यात आहे. या खाऊच्या स्टॉल्समुळे पदपथावरुन चालणाऱ्या पादचाऱ्यांना मोठ्याप्रमाणात अडथळा ठरत होता. हा स्टॉल संपूर्ण स्टीलचा ४ मीटर बाय २.८ मीटर आकाराचे आहे. या स्टॉलमुळे नागरिकांना चालताना होणाऱ्या त्रासामुळे महापालिकेकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तक्रारींची दखल घेत पदपथावरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय उपायुक्त (परिमंडळ ५) हर्षद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व एम/पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. शुक्रवारी एम/पश्चिम विभाग, देखभाल विभाग आणि आरोग्य खाते, परवाना विभागाने संयुक्तपणे ही धडक मोहीम राबवित हे पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यात आले. या या खाद्य विक्रीच्या स्टॉल्समधून गॅस सिलेंडर, भांडी व इतर सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे.
एम/पश्चिम विभाग कार्यालयाचे १२ अभियंता, १ आरोग्य अधिकारी, वेगवेगळ्या खात्यांचे ४ कर्मचारी, २ मुकादम, १२ कामगार तसेच १ जेसीबी, १ डंपर, मेसर्स अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीचे कर्मचारी यांनी मिळून या जागेवरील अतिक्रमण जेसीबीद्वारे काढून टाकण्यात आले आहे.