चिपळूण : चिपळूण तालुक्यातील मुंढेतर्फे चिपळूणचा गेल्या कित्येक वर्षाचा पाणीप्रश्न माजी सभापती सुर्यकांत खेतले यांच्या प्रयत्नाने व आमदार शेखर निकम यांच्या पुढाकाराने सुटला आहे. या पाणी योजनेचे भूमिपूजन नुकतेच माजी सभापती पूजा निकम यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्ह्यातील जलजीवन मिशनचा सर्वात पहिा प्रस्ताव मुंढे तर्फे त्योळी शासनाकडून फक्त तीस लाखाची मंजुरी मिळाली होती. तीस लाखांमध्ये सदरचे काम होणे शक्य नव्हते. ही बाब माजी सभापती सुर्यकांत खेतले यांनी आमदार शेखर निकम यांच्या लक्षात आणून दिली. यानंतर तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री माननीय गुलाबराव पाटील यांच्या समवेत आमदार शेखर निकम खेतले यांच्या मंत्रालयामध्ये दोन बैठका झाल्या आणि जवळपास दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. पुढील कित्येक वर्षाचा पाणी प्रश्न आमदार शेखर निकम यांनी सोडवला. आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच कातकरी वाडीला सुद्धा पाणी मिळणार आहे.
जाहिरात :