
⏩मुंबई : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स संघाने दिल्लीचा पराभव करत पहिल्या महिला आयपीएल स्पर्धेवर नाव कोरले. सेविर ब्रंट हिने मोक्याच्या क्षणी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या बळावर मुंबईने जेतेपदाला गवसणी घातली. दिल्लीने दिलेले 132 धावांचे आव्हान मुंबईने सात विकेट राखून सहज पार केले.
⏩हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाली मुंबई संघाने इतिहास रचला. पहिल्या वहिल्या महिला आयपीएल स्पर्धेवर त्यांनी नाव कोरले. या स्पर्धेत मुंबईकडून गोलंदाजी आणि फलंदाजीत दमदार कामगिरी पाहायला मिळाली.
⏩वुमन्स प्रिमीयर लिगमधील आघाडीच्या पाच गोलंदाजात मुंबईच्या चार खेळाडूंचा समावेश आहे. तर फलंदाजीतही मुंबईच्या खेळाडूंचा बोलबला राहिला. केर, ब्रंट आणि मॅथ्यूज यांनी संपूर्ण हंगामात अष्टपैलू खेळीचं प्रदर्शन केले.