मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक जलद…कोणत्या स्थानकावर थांबणार मेट्रो..

Spread the love

मुंबई : विधान भवन स्टेशनचे काम ९३ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे तर एमआयडीसी स्थानकाचे काम ९६ टक्क्यांपर्यंत पूर्ण झालं आहे. मार्च २०२१पासून या मार्गावर रुळ बसवण्याचे काम सुरु आहे. आत्तापर्यंत हे काम ५६ टक्क्यांपर्यंत पूर्ण झालं आहे. ३३.५ किलोमीटरची ही मार्गिका आहे. एमएमआरसीने आरेतील कारशेड लवकरात लवकर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवलं आहे. कारशेडचं काम आत्तापर्यंत ५३.८ टक्के पूर्ण झालं आहे. या वर्षात कारशेडचं काम पूर्ण होऊ शकत नसल्याने एमएमआरसीएलने सीप्झ ते बीकेसीपर्यंत ९ रेकसह मेट्रो सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

मेट्रो ३चा पहिला टप्पा डिसेंबर २०२३मध्ये सुरु करण्याआधी प्रत्यक्ष वेगाने चाचण्या करण्यात येणार आहे. सीप्झ ते बीकेसी उत्तर, पर्यंत तब्बल १० हजार किलोमीटरच्या अशा चाचण्या होतील. तर, दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या या जुलै २०२४पर्यंत पूर्ण केल्या जाणार आहेत. सध्या मेट्रो ३चं काम प्रगतिपथावर असून या मार्गावर ७९.८ टक्के काम पूर्ण झालं आहे

कोणत्या स्थानकावर थांबणार मेट्रो

कफ परेड, विधानभवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसएमटी
कालबादेवी,गिरगाव, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल,महालक्ष्मी,सायन्स म्युझियम,आचार्य अत्रे चौक,वरळी,सिद्धिविनायक,दादर,शीतला देवी,धारावी,बीकेसी,विद्यानगरी, सांताक्रुझ,सीएसएमआयए (टी १),सहार रोड,सीएसएमआय (टी २),मरोळ नाका,एमआईडीसी,सीप्झ

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी जणशक्तीचा दबावर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा मराठी न्यूज वेबसाइट जनशक्तीचा दबावर.
दबाव जनशक्तीचा ……निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page