मुंबई – उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी २१ जानेवारी २०२४ रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा -ठाणे अप आणि डाउन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावरील कुर्ला – वाशी अप आणि डाउन मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात रविवारी कोणताही दिवसा ब्लॉक नसणार आहे.
मध्य रेल्वे –
- कुठे – माटुंगा- मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर
- कधी- सकाळी ११ .०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत
परिणाम –
या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. या सेवा गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशीराने पोहोचेल.
हार्बर मार्गावर –
- कुठे – कुर्ला- वाशी अप आणि डाउन मार्गावर
- कधी – सकाळी ११. १० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत
परिणाम –
ब्लॉक कालावधीत वाशी बेलापूर, पनवेल येथून सुटणाऱ्या सीएसएमटी मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून वाशी/ पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे. प्रवाशांच्या सोईसाठी ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला, पनवेल आणि वाशी दरम्यान विशेष लोकल सेवा चालवल्या जातील. याशिवाय हार्बर मार्गावरील प्रवासी सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यत ट्रान्सहार्बर मार्गावरून प्रवास करू शकता.
जाहिरात