मुंबई विद्यापीठ रत्नागिरी उप-परीसरात पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया सुरू

Spread the love

रत्नागिरी (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठाच्या चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उप-परिसरात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे. विद्यार्थ्यांना एमएससीच्या रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र हे अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठ रत्नागिरी उपपरीसरात उपलब्ध आहेत.

एमएससी रसायनशास्त्र (chemistry) विभागासाठी एकूण 60 जागा असून ऑरगॅनिक, ॲनेलेटीकल, फिजीकल तसेच इनऑरगॅनीक रसायनशास्त्र विषयातील स्पेशलायझेशन मध्ये प्रवेश दिला जातो.
झूलाॅजी विभागातमध्ये ओशनोग्राफी स्पेशलायझेशन साठी एकूण 25 जागा असून सदर अभ्यासक्रम विषेशतः सामुद्रिक अभ्यास व फिशींग व फिश प्रोसेसिंग कौशल्याधारित आहे त्यामुळे संबंधित उद्योगातील रोजगार तसेच संशोधन संधी उपलब्ध होतात.

पर्यावरणशास्त्र (Environmental Science) विभाग गेली 20 वर्ष रत्नागिरी उपपरिसरात सुरू असुन प्रवेश क्षमता 20 विद्यार्थी आहे. या विभागाचे वैशिष्ट्य म्हणजे Phd सेंटर या विभागात उपलब्ध आहे. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं संशोधन केंद्र याठिकाणी उपलब्ध असल्याने प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना याचा सर्वात जास्त फायदा होतो.

तिन्ही विभागाची स्वातंत्र्य अशी प्रयोगशाळा आहे तसेच विद्यार्थ्यांच्या नेट आणि सेट परीक्षेची तयारी देखील करून घेतली जाते विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढावी यासाठी आविष्कार सारख्या संशोधन स्पर्धेत देखील विद्यार्थी सहभाग घेतात.विध्यार्थ्यांना नोकरी देखील मिळवून देण्यासाठी विविध कंपन्यां ह्या रत्नागिरी उपपरिसरात येत असतात

या तीन विषयांच्या अभ्यासक्रमासाठी मुंबई विद्यापीठ
उपपरिसराने शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिलीय..त्यासाठी अगोदर नोंदणी करणे आवश्यक असून मुबई विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाऊन रत्नागिरी उपपरिसराच्या वेबपेजवरील लिंकच्या माध्यमाटुंबाब नोंदणी करणे आवश्यक आहे… शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या फी च्या सवलती या उपकेंद्राला लागू आहे… मुंबई विद्यापीठाने गेल्या अनेक वर्षांत अनेक नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू केले आहेत त्यामुळे या प्रवेश प्रक्रियेत दर वर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी अर्ज करतात. त्याचप्रमाणे या तीनही अभ्यासक्रमाच्या माध्यमातून रोजगाराची संधीही विध्यार्थ्यांना उपलब्ध होतआहे. रत्नागिरी उपपपरिसराचे मुख्य वैशिष्ठ म्हणजे उज्ज्वल यशाची परंपरा आजही कायम आहे तसेच सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळा, उत्कृष्ठ प्राध्यापक वर्ग आणि शिष्यवृत्तीची व्यवस्था रत्नागिरी उपपरिसराने उपलब्ध करून दिलेली आहे.

तरी इच्छूक विद्यार्थ्यांनी त्वरित नाव नोंदणी करून प्रवेश निश्चित करावा असं आवाहन उपपरिसराचे प्रभारी संचालक डॉ किशोर सुखटणकर यांनी केला आहे तसेच प्रवेश प्रक्रियेसाठी 08550955999, 9619894543 आणि 09665334103 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन उपपरिसराचे प्रभारी कुलसचिव अभिनंदन बोरगावे यांनी केले आहे

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page