मुंबई इंडियन्सने होम ग्राउंडवर रोवला IPL 2025 मधील विजयाचा पहिला झेंडा, KKR ला केलं नेस्तनाभूत…

Spread the love

स्पोर्ट /प्रतिनिधी- मुंबई इंडियन्सने केकेआरचा धुव्वा उडवत नव्या सीजनचा पहिला विजय नावावर केला. यापूर्वी मुंबई इंडियन्स सलग दोन सामन्यात पराभूत झाली होती, मात्र वानखेडेवर मुंबईने जबरदस्त  खेळी करून पुन्हा कमबॅक केलं.

मुंबई इंडियन्सने होम ग्राउंडवर रोवला IPL 2025 मधील विजयाचा पहिला झेंडा, KKR ला केलं नेस्तनाभूत

*MI VS KKR –* वानखेडे स्टेडियमवर आयपीएल 2025 चा बारावा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने केकेआरचा धुव्वा उडवत नव्या सीजनचा पहिला विजय नावावर केला. यापूर्वी मुंबई इंडियन्स सलग दोन सामन्यात पराभूत झाली होती, मात्र वानखेडेवर मुंबईने जबरदस्त  खेळी करून पुन्हा कमबॅक केलं. मुंबईने कोलकातावर 8 विकेटने विजय मिळवला.

*मुंबईने टॉस जिंकला –*

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएल 2025 चा 12 वा सामना खेळवण्यात आला.  या सामन्याचा टॉस मुंबई इंडियन्सने जिंकला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर केकेआरला प्रथम फलंदाजीचं आव्हान दिलं. हार्दिक पंड्याने होम ग्राउंडवरील पहिल्या सामन्यासाठी प्लेईंग 11 निवडताना एका नव्या खेळाडूला संधी दिली आहे.  23 वर्षीय क्रिकेटर अश्वनी कुमार याने मुंबईकडून आजच्या सामन्यात पदार्पण केले तर प्लेईंग 11 मध्ये विल जॅकचं सुद्धा पुनरागमन झालं. तर केकेआरच्या सुद्धा प्लेईंग 11 मध्ये सुनील नरेनची पुन्हा एंट्री झाली असून तो मोईन अलीच्या जागी खेळला.

मुंबईला मिळाला नवा सितारा :
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच कोलकाताच्या फलंदाजांना घाम फोडला. मुंबईच्या बॉलिंग अटॅक समोर केकेआर 16.2 ओव्हरमध्ये 116 धावाच करू शकली. मुंबईकडून सर्वाधिक विकेट पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या अश्वनी कुमारने घेतल्या. अश्वनीने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या यात अजिंक्य रहाणे, आंद्रे रसेल, रिंकू सिंह आणि मनीष पांडे याचा सहभाग होता. तर याव्यतिरिक्त दीपक चहरने आणि ट्रेंट बोल्ट, हार्दिक पंड्या, विग्नेश पुथूर तसेच मिचेल सॅटनरने प्रत्येकी 1 विकेट घेतल्या. अजिंक्यला बाद केल्यावर आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्सकडून पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्याच बॉलवर विकेट घेणारा अश्वनी कुमार हा चौथा गोलंदाज ठरला. तर  अश्वनी हा आयपीएलमधील पदार्पण सामन्यात 4 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page