
१७०२ पदवीधर मतदार नाव नोंदणी
मुंबई (शांताराम गुडेकर/मोहन कदम )
महाराष्ट्र निर्वाचन आयोग द्वारा आयोजित मुंबई एवं कोकण विभागीय पदवीधर मतदारसंघ अंतर्गत दिनांक ३० सप्टेंबर ते ०६ नोव्हेंबर या कालावधीत, पदवीधर मतदार नाव नोंदणी अभियान राबविण्यात आले.सदर अभियान अंतर्गत, महाराष्ट्र निर्वाचन आयोग द्वारा, नव पदवीधर मतदार तथा समाविष्ट मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी व्यापक अभियान हाती घेण्यात आले होते. गोरेगाव स्थित निर्वाचन आयोग कार्यालय अंतर्गत सहा. मतदार नोंदणी अधिकारी श्री.दीपक पवार, अति.सहा. मतदार नोंदणी अधिकारी श्रीमती.अनुराधा दळवी, नायब तहसिलदार कु.नेहा हिर्लेकर, प्रगणक श्री.सुनील नागरे यांच्या अथक परिश्रमातून १७०२ पदवीधर मतदार नाव नोंदणी करण्यात आली.सदर लोकशाही समृद्ध करणारे व्यापक अभियान राबविण्यासाठी कार्यरत निर्वाचन आयोगतील सर्व अधिकाऱ्यांचे व्हिजन इंडिया अध्यक्ष श्री. स्वप्नील वाडेकर यांनी विशेष आभार व्यक्त केले.व्हिजन इंडिया युवकांसाठी कार्यरत संस्था असून तृतीयपंथी मतदार नाव नोंदणी पासून प्रथम मतदान करणाऱ्या युवकापर्यंत सर्वांना लोकशाहीतील महत्वपूर्ण प्रक्रियेत सहाय्य करण्यासाठी प्रयत्नशील आहे. एसपीएसटी संस्था, युथ फॉर नेशन मुंबई अध्यक्ष श्रीराम सिघं, आरेक्स संचालक श्री. रमेश राजपूत इत्यादी द्वारा सदर अभियानात भरीव योगदान देण्यात आले.