
▪️यंदाच्या आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन टीम आज आमने सामने येणार आहेत. या दोन्ही टीमने अजूनपर्यंत एकही विजय मिळवला नाही. या दोन्ही टीम्सपैकी आज एकाच खात उघडणार हे निश्चित आहे. हा सामना अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळला जाणारं आहे. दिल्ली कॅपिटल्सने या सीजनमध्ये पराभवाची हॅट्ट्रिक केलीय. तर मुंबई इंडियन्सचा दोन सामन्यात पराभव झालाय.