मुंबईसह महाराष्ट्राला बसणार उन्हाचे चटके, हवामान खात्याचा अंदाज
मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार 2 दिवसांत मुंबईचे कमाल तापमान 37 ते 39 अंश से.एवढे होणार आहे. कोकणामध्ये काही ठिकाणी उष्णतेची लाट येणार आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यातच (फेब्रुवारी 2023) पारा चाळीशीच्या घरात पोहोचेल आणि उन्हाचे चटके जाणवू लागतील.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 5 दिवस मुंबईचे आकाश निरभ्र राहील. उन्हाचे चटके जाणवतील. रविवार 19 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबईत सांताक्रुझ येथे ३६.५ से. आणि कुलाबा येथे ३४.२ अंश से. तर रत्नागिरी येथे ३५.१ अंश से. तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमाल तापमान मागील 33 ते 35 अंश से. दरम्यान असल्याचे चित्र आहे.