मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गवर कोळंबे येथे जे .एम .म्हात्रे कन्ट्रक्शन कंपनीच्या डंपर ने कुरधुंडा येथील दुचाकीस्वार मुजीब सोलकर यांना उडवले , दुचाकीस्वार जागीच ठार…

Spread the love

मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच.. ग्रामस्थांनी कंपनीत ठेकेदाराला धरले धारेवर…

संगमेश्वर:  मुंबई गोवा हायवे क्रमांक 66 वरती संगमेश्वरपासून काही अंतरावर असलेल्या कोळंबे  येथे म्हात्रे कंपनीचा डंपर आणि दुचाकीमध्ये काही वेळापूर्वी अपघात झाला असून या अपघात दुचाकीस्वार मुजीब  सोलकर याचा जागीच मृत्यू झाला आहे.


दुचाकीला अपघात करून डंपर चालक तेथे न थांबता त्याने तेथून पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच कुरधुंडा  गावासह परिसरातील लोकांची मोठ्या प्रमाणग गर्दी झाली असून मृत मुजीबचे कुटुंबीय तसेच नातेवाईक सुद्धा अपघातस्थळी जमा झाले आहेत. सदर घटना दुपारी १ च्या दरम्यान घडली असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.


अपघातस्थळी जे. एम. म्हात्रे कंपनीचा डंपर असून कंपनीच्या अधिकाऱ्यांना याची कल्पना देण्यात आली.  मात्र. दोन तस उलटून गेले तरी अद्याप कोणीच घटनास्थळी दाखल न झाल्याने जमलेला जमाव चांगलाच संतप्त झाला आहे. या संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रस्ता रोखून धरला होता.

ग्रामस्थांनी महामार्ग रुखून धरला..

मुंबई गोवा महामार्ग क्रमांक 66 वरती कॉन्ट्रॅक्टरचे अजब कारभार चालू आहेत. कोळंबी येथे एक व्यक्तीचा जीव अपघातामध्ये जातो आणि कॉन्ट्रॅक्टरची माणूस किंवा कोणीही जागेवर येत नाही. माणुसकीला काळीमा फासणारी घटना इथे घडले आहे. नागरिकांनी ट्रॅक्टरच्या मुजूर कारभाराविरोधात मुंबई व महामार्ग दोन तास रोखून धरला होता. पोलिसांनी कळवणे ही कॉन्ट्रॅक्टरचे माणसे जागेवर आली नव्हती. नागरिकांनी वारंवार खड्डे भरण्यासाठी गणपतीच्या अगोदर पासून कॉन्ट्रॅक्टरला सांगितले होते परंतु कॉन्ट्रॅक्टरने खड्डे भरले नव्हते म्हणून सदरचा अपघात झाला आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मुंबई गोवा हायवे वरती खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्याला सर्वस्वी जबाबदार कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून अपघाताची जबाबदारी कॉन्ट्रॅक्टरने घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली. अखेर पोलिसांच्या मध्यस्थी नंतर चार वाजायच्या दरम्यान कॉन्ट्रॅक्टर व ग्रामस्थांच्या बातचीत झाल्यानंतर महामार्ग चालू करण्यात आला.

सतत्त जमावाने मुलाचे बॉडी घेण्यास नकार…

कोळंबी येथे झालेल्या अपघाताची बातमी कळताच पंचक्रोशीतून लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. मृत मुलाची मृतदेह ताब्यात घेण्यास नागरिकांनी नकार दिला जोपर्यंत कॉन्ट्रॅक्टर येत नाही व जबाबदारी घेत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असे नागरिकांनी सांगितले महामार्ग रोखून धरला होता. नागरिकांच्या मागणीनुसार खड्डे भरण्याचे आश्वासन कॉन्ट्रॅक्टरने दिल्यानंतर व अपघाताची जबाबदारी घेतल्यानंतर ताब्यात घेण्यात आला.

अस्ववेदनशील कॉन्ट्रॅक्टर वर गुन्हा दाखल होणार का?

मुंबई गोवा हायवे वर गेली अनेक दिवस अपघातांची मालिका चालूच आहे. यापूर्वीही एक रिक्षाचालकाचा जीव गेला आहे. दोन दिवसांपूर्वीच मुंबई गोवा हायवे वरती लक्झरी व कॉन्ट्रॅक्टरच्या डंपर चा अपघात झाला होता. त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर चे डंपर ड्रायव्हर व ट्रॅव्हल्स ड्रायव्हर हे जखमी झाले होते सदरचा अपघातही फार मोठा होता. व आज परत अपघात झाला आहे त्यामध्ये निष्पाप मुलाचा जीव गेला आहे. कॉन्ट्रॅक्टर ने खड्डे न भरल्यामुळे सदरचा अपघात झाला आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर वर गुन्हा दाखल होणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे. अगोदरही सामाजिक कार्यकर्त्यांनी लेखी पत्र व्यवहार केले आहेत परंतु अधिकारी किंवा कॉन्ट्रॅक्टरने कोणतीही कारवाई केलेली नाही.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार खड्ड्याचे भरायचे काम उद्यापासून चालू करतो असे कॉन्ट्रॅक्टर चे मॅनेजर हळद शेठ सांगितले

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page