रिकटोली येथील नालंदा बुद्ध विहाराच्या सुशोभीकरण उद्घाटन समारंभात केले प्रतिपादन, विविध कार्यक्रमांचे आयोजन!…
चिपळूण : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कठोर परिश्रम घेऊन भारताची राज्यघटना व भारतीय लोकशाही आपल्याला दिली आहे . त्यांच्या या कठोर मेहनतीमुळेच भारताचे संविधान सर्वश्रेष्ठ ठरलेले आहे. या संविधानामुळेच आज आपल्या देशाची एकता व अखंडता कायम असून लोकशाही व्यवस्था अबाधित आहे. याचे सारे श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना द्यावे लागेल, असे स्पष्ट प्रतिपादन रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी येथे केले.
चिपळूण तालुक्यातील रिकटोली बौद्धजन मंडळ तथा चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती, गावशाखा रिकटोली यांच्या वतीने नालंदा बुद्ध विहाराच्या सुशोभीकरण व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध या महामानवांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून खासदार विनायक राऊत बोलत होते . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भालचंद्र जाधव तर स्वागताध्यक्ष स्थानिक रमेश जाधव, दीपक जाधव, चंद्रकांत जाधव हे होते. यावेळी विचारपिठावर खासदार विनायक राऊत यांच्या समवेत शिवसेना (उभाठाचे) तालुकाप्रमुख विनोद झगडे, पंचायत समितीचे माजी सदस्य राकेश शिंदे, रिकटोलीचे सरपंच दयानंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वप्निल शिंदे तसेच चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती , तिसगाव विभागाचे सरचिटणीस नारायण जाधव, संस्थेचे तालुका शिक्षण कमिटीचे अध्यक्ष तथा पत्रकार संदेश पवार , तिसगाव विभागाचे उपाध्यक्ष संजय मोहिते गुरुजी, यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
खासदार राऊत पुढे म्हणाले, आपल्या मंडळाने खूप परिश्रम करून नालंदा बुद्ध विहाराचे नूतनीकरण व सुशोभीकरण केले आहे. ही वास्तू अत्यंत देखणी व मनमोहक बनलेले आहे. या कामासाठी आपल्याला गावाचे सरपंच, तसेच विनोदजी झगडे, राकेश शिंदे यासारख्या स्थानिक लोकप्रतिनिधींचे सहकार्य लाभलेले आहे. त्यांना देखील धन्यवाद दिले पाहिजे असे सांगितले.
तर माजी बांधकाम सभापती विनोद झगडे यांनी आपल्या मनोगतात माझ्या जिल्हा परिषद गटातील सर्वच गावांमध्ये आपण पक्षनिरपेक्ष वृत्तीने काम केले याचे समाधान असल्याचे सांगितले. रिकटोली गावातील या बुद्ध विहारासाठी मला काम करता आले याचा अभिमान वाटतो. सर्व वाडी वस्ती, बहुजन समाजामध्ये जास्तीत जास्त काम करण्याची तळमळ असून त्याच पद्धतीने आपण काम करीत असल्याचे नमूद केले . तर राकेश शिंदे यांनी आपल्या मनोगतात गावाच्या विकासासाठी आपल्याला मतदान किती? याचा विचार न करता शिवसेना नेहमीच काम करत राहते. आणि त्या पद्धतीने विनोद झगडे यांनी कामाचा धडाका आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये लावलाच लावल्याचे नमूद केले. पत्रकार संदेश पवार यांनी आपल्या मनोगतात खासदार विनायक राऊत व विनोद झगडे यांच्या कामाचे कौतुक करून विविध प्रकारे समाज विकासाची कामे तळागाळापर्यंत लोकप्रतिनिधींकडून अधिकाधिक पद्धतीने व्हावी, बहुजन वाडी,वस्तीवर व्हावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्षीय मनोगत भालचंद्र जाधव यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सकाळी धम्म ध्वजारोहण मधुकर जाधव, पांडुरंग जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज व शहीद शशांक शिंदे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर नंतर धम्मपूजा पाठ बौद्धाचार्य जयरत्न कदम गुरुजी यांच्या हस्ते तसेच धम्म प्रवचन मार्शल अनिकेत उबाळे यांनी केले. या निमित्ताने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते त्यांचा पारितोषिक वितरण समारंभही पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध समालोचक अमित आदावडे यांनी केले.
या कार्यक्रमास सचिन जाधव, शशिकांत जाधव, कमलेश जाधव, सिद्धार्थ जाधव, विलास जाधव, विश्वास जाधव, सुधीर जाधव ,जगन्नाथ जाधव ,श्रीधर जाधव, मनोहर जाधव सिद्धार्थ जाधव सुप्रिया जाधव ,माजी सरपंच संघमित्रा जाधव, प्रियंका जाधव ,शितल जाधव, शुभांगी जाधव ,मंजुळा जाधव ,रामचंद्र वराळे गुरुजी, संघपाल जाधव, विश्वजीत जाधव, सुशांत जाधव ,स्वप्निल जाधव, प्रशांत जाधव , प्रवीण जाधव, पंकज जाधव, नितेश जाधव, धीरज जाधव, मनीष जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.