खासदार विनायक राऊत यांनी गेल्या नऊ वर्षाच्या कारकिर्दीत एकही उल्लेखनीय काम केले नाही ,भाजप नेत्याचा आरोप

Spread the love

नवी मुंबई : खासदार विनायक राऊत यांनी गेल्या नऊ वर्षाच्या कारकिर्दीत आपल्या लोकसभा मतदारसंघात एकही उल्लेखनीय विकासकाम केलेले नाही.
मागील चार वर्षात बीएसएनएलच्या जिल्हा समितीच्या बैठकीला त्यांनी वेळ न दिल्याने एकही बैठक होऊ शकलेली नाही. फक्त मोबाईल टॉवर मंजुरीचा डाटा मिळवून मोबाईल टॉवरचे भूमिपूजन करून त्याचे श्रेय मिळवण्यासाठी राजकीय स्टंटबाजी करण्याचे काम ते करत असल्याची टीका भाजपचे नेते संतोष गांगण यांनी केली आहे. टेलिकॉम सल्लागार समिती सदस्य म्हणून विविध माध्यमातून दूरसंचार मंत्रालयाशी पत्रव्यवहार व नियमित पाठपुरावा करून आपण जिल्ह्यामध्ये १९१ मोबाईल टॉवर मिळवण्यात यश मिळवल्याचा दावाही गांगण यांनी केला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page