मुरबाड भ्रष्टाचाराचा दोषी अधिकारी, ठेकेदार यांच्यावर करणार कारवाई
ठाणे/ मुरबाड दि.२१
(प्रतिनिधी )
लक्ष्मण पवार
नुकताच भिवंडी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाला मामा हे मुरबाड विधानसभेतील नागरिक व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीसाठी आले असता 50 हून अधिक नागरिकांच्या समस्यांचे निवेदने त्यांना प्राप्त झाली असून मुख्यतः मुरबाड कल्याण रेल्वे साठी १३०० कोटी रुपयांची मागणी संसदेत करणार असल्याचे मुरबाड येथे कार्यकर्त्यांशी बोलताना केली आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मुरबाड विधानसभा क्षेत्रातील विकास कामाकरिता विकासाला चालना देण्यासाठी यापुढे ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांना पहिले प्राधान्य दिले जाणार आहे असे प्रतिपादन नवनिर्वाचित खासदार (बाळ्या मामा ) सुरेश गोपीनाथ म्हात्रे यांनी मुरबाड शासकीय विश्रामगृह शिवनेरी येथे आयोजित केलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत केले.
यावेळी व्यासपीठावर शिवसेना उभाटा उपजिल्हाप्रमुख अप्पा घुडे, मुरबाड तालुका इंदिरा काँग्रेस अध्यक्ष चेतनसिंह पवार , शरदचंद्र पवार गटाचे मुरबाड तालुका अध्यक्ष दीपक वाघचौरे मुरबाड बोभाटा तालुकाप्रमुख संतोष विषय मुरबाड नगरपंचायत माजी नगराध्यक्ष रामभाऊ दुधाले, रिपाई सेक्युलर जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने ,रिपाई सेक्युलर तालुका अध्यक्ष लक्ष्मण खोळंबे, यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी खासदार बाळ्या मामा पुढे म्हणाले की ज्या समस्यांचे निवेदन आज या बैठकीत प्राप्त झाले आहे ते निवेदन निश्चितपणे पाठपुरावा करून सोडवण्यात येईल तसेच दर महिन्याला समस्या जनता दरबार भरवला जाईल व सर्व प्रकारच्या समस्यांना प्राधान्य देण्यात येईल विशेषतः भिवंडी लोकसभेतील शेतकऱ्यांना शेतीच्या मालाला योग्य बाजार भाव मिळावा म्हणून मुंबई ,ठाणे ,भिवंडी ,कल्याण या ठिकाणी बाजारपेठा निर्माण करणार असल्याचे पत्रकारांशी बोलत होते तसेच केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेल्या अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करणार असल्याचे ते यावेळी बोलत होते.
१)वीज, रस्ते ,पाणी, उद्योग यांना विशेष प्राधान्य देऊन संसदेत बिल पारित करणार …
खासदार: (बाल्या मामा) सुरेशगोपीनाथ म्हात्रे*
२) मुरबाड/ कल्याण रेल्वे मार्गासाठी येत्या बुधवारी संसदेत १३०० कोटींची मागणी
३) शेतकऱ्यांना शेतमालासाठी मुंबई, ठाणे, कल्याण ,भिवंडी येथे मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देणार
४) केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनमध्ये भिवंडी लोकसभेत भ्रष्टाचार केलेल्या दोषी अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करणार
खासदार : (बाल्या मामा) सुरेश गोपीनाथ म्हात्रे
५) भिवंडी लोकसभेत महिन्याला जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबार भरवणार
खासदार: बाळ्या मामा म्हात्रे