
पालिकेने या चौकांमध्ये दर्शक यंत्रणा बसविण्यासाठी पुढाकार घ्यावा,
दिवा : प्रतिनिधी दिव्यातील टर्निंग चौक आणि वाहतूक कोंडी (Traffic Jam At Diva Turning Chowk) असे जणू समिकरणच बनले आहे.
दिवा पूर्वेतील स्टेशन रोड रस्त्यावरील चंद्रागण रेसिडेंसी समोरील संगीतमय चौकात (दिवा टर्निंग ) बेतवडे, दातीवली,आगासन रस्ता मार्गे येणारी वाहने आणि खर्डी ,डावले,भागातील वाहने येजा करतात. याशिवाय रेल्वे स्थानकातून गणेश नगर, मात्रे नगर,बेडेकर नगर भागातून जाणारी वाहने याच चौकातून येजा करतात. एकावेळी चारही बाजुने येणारी ही वाहने संगीतमय (दिवा टर्निंग) चौकात आल्यानंतर याठिकाणी दर्शक यंत्रणा नसल्याने किंवा वाहतूक पोलीस नसल्याने दररोज सकाळ आणि संध्याकळी या चौकात कोंडी होते, असे वाहन चालक यांनी म्हटले आहे.
दिव्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला विद्युत वाहिनी पोल ठरतोय वाहतूक कोंडीचे कारण;

संध्याकाळी सहा ते नऊ वेळेत या दोन्ही चौकात वाहतूक पोलीस, सेवक तैनात केले तर या भागात कोंडी होणार नाही. प्रत्येक वाहन चालक पुढे जाण्यासाठी पर्यायी मार्ग अवलंबतात त्यामधून जास्त कोंडी होत जाते. मुंब्रादेवी कॉलोनी रोड येथील वाहने वारेकर शाळा ते सिद्धिविनायक गेट मार्गे दिवा दातीवली रोडला येतात. अंतर्गत रहदारीचे रस्ते अरुंद असल्याने दोन मोठी वाहने या भागात समोरासमोर आली तर वाहन कोंडी होते,
पहा सविस्तर
जाहिरात

