
ठाणे – ठाण्यातील पाचपाखाडी भागात सुरू झालेल्या निमाई बॉर्निओ या हॉस्पीटलने ठाण्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या २५ महिलांचा खास सत्कार केला.
कला, पोलीस, वैद्यकीय तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलाना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.
यावेळी ठाणे परिसरातील महिलांसाठी लकी ड्रा चे आयोजन करण्यात आले होते. विजेत्याला २५ हजाराची पैठणी साडी बक्षीस म्हणून देण्यात आली.
बाळ जन्माला यायच्या आधीपासून त्याची पूर्वतयारी ते बाळंतपण व त्यानंतरची बाळाची काळजी घेणारे एक सुसज्ज बर्थींग सेंटर पाचपाखाडी भागात बॉर्नीओ नावाने सुरू झाले आहे. ५० बेडची सुविधा असलेल्या या हॉस्पीटलने आयुर्वेद व नवीन तंत्रज्ञान यांचा मेळ घालत सुरू केलेल्या या हॉस्पीटलमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. अशी माहिती निमाई बॉर्निओचे मॅनेजिग डायरेक्टर डॉ. संतोष मद्रेवार यानी दिली. बॉर्निओ या मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पीटलमध्ये महिला व लहान मुलांची विशेष काळजी घेतली जाणार आहे