
आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन चांगलं राहील, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य (Horoscope) कसं असेल?, जाणून घ्या आचार्य सरिता शर्मा यांच्या आजच्या राशीभविष्यात.
मेष (ARIES) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात असेल. आज सार्वजनिक कार्यक्रमात वेळ खूप आनंदात जाईल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल. त्यांच्याकडून लाभ होईल. निसर्गाच्या सान्निध्यात सहलीला जाल. सरकारी आणि निम-सरकारी कामात यश मिळेल. दांपत्य जीवनात सुख मिळेल आणि सुसंवाद राहील. प्राप्तीचे नवीन स्त्रोत प्राप्त होतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
वृषभ (TAURUS) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशम भावात असेल. आजचा दिवस नवीन कामाचं नियोजन करण्यासाठी अनुकूल आहे. नोकरी-व्यवसायात लाभदायी परिणाम मिळतील. पदोन्नती होईल. व्यापारात नवीन दिशा स्पष्ट होतील. सरकारकडून लाभ मिळण्याची बातमी मिळेल. मान-प्रतिष्ठा वाढेल. अडलेली कामे पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात माधुर्य राहील.
मिथुन (GEMINI) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून भाग्यात असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्यानं आपल्या कामास विलंब होईल. शरीरात उत्साह असणार नाही. पोटाचे विकार सतावतील. नोकरीत वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. राजकीय अडचणी व्यत्यय आणतील. महत्वाचे काम किंवा निर्णय आज घेऊ नका. संततीशी मतभेद होतील. प्रतिस्पर्धी आणि विरोधकांचा त्रास होईल.
कर्क (CANCER) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टम भावात असेल. आज आपल्या मनातील नकारात्मकता नैराश्य निर्माण करेल. बाहेरील पदार्थांच्या खाण्या पिण्यामुळं आरोग्य बिघडेल. रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. कुटुंबियांशी भांडण होईल. नवे संबंध त्रासदायक ठरतील. आर्थिक चणचण भासेल. एखादी दुर्घटना किंवा शस्त्रक्रिया संभवते. मनाला शांतात लाभण्यासाठी प्रयत्न करावेत.
सिंह (LEO) : आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सातव्या भावात असेल. आज पती-पत्नीत किरकोळ कारणांनी खटका उडून मतभेद होतील. जोडीदाराच्या प्रकृतीची चिंता राहील. प्रापंचिक गोष्टींबाबत उदासीन राहाल. सार्वजनिक जीवनात अपयश येण्याची शक्यता आहे. भागीदारांशी मतभेद होतील. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास त्रासदायक ठरेल. कोर्ट – कचेरीतील प्रश्न सुटायला विलंब होईल.
कन्या (VIRGO) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहाव्या भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात सुख शांतीचं वातावरण राहिल्यामुळं मन ही प्रसन्न राहील. काही सुखद प्रसंग घडतील. प्रकृती उत्तम राहील. रुग्णांची तब्बेत सुधारेल. आर्थिक लाभ होतील तसेच यशही मिळेल. सहकारी पूर्ण सहकार्य करतील. स्त्रियांना माहेरहून आनंददायी बातमी मिळेल.
तूळ (LIBRA) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचव्या भावात असेल. आजचा दिवस अत्यंत सुखात जाईल. बौद्धिक कामे आणि चर्चेत दिवस घालवू शकाल. आज कल्पनाशक्तीचा उपयोग आपण करू शकाल. संततीकडून काही चांगली बातमी मिळेल. आपली प्रगती होईल. स्त्रियांकडून सहकार्य मिळेल. उत्साहाचा प्रभाव राहील. मनात सकारात्मक विचार येतील.
वृश्चिक (SCORPIO) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून चौथ्या भावात असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. शक्यतो आज शांत राहावं. मन चिंतीत राहील आणि संबंधीतांशी मतभेद होतील. आरोग्याविषयी काळजी लागून राहील. यशहानी किंवा धनहानी होऊ शकते. एखाद्या स्त्रीमुळं आपण अडचणीत येण्याची शक्यता आहे. एखादा अपघात संभवत असल्यानं शक्यतो पाण्यापासून दूर राहा. कायदेशीर कार्यवाहीत सावध राहावं लागेल.
धनू (SAGITTARIUS) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून तिसऱ्या भावात असेल. आज आपणास एखाद्या गूढ विद्येचं आकर्षण वाटेल. भावंडांशी चांगले संबंध राहतील. नवीन कार्यारंभ करण्यासाठी अनुकूलता लाभेल. मित्रमंडळींशी संपर्क होऊ शकेल. कामात यश मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. एखादा प्रवास संभवतो. नशिबाची साथ मिळेल. सामाजिक मान – सन्मान संभवतात.
मकर (CAPRICORN) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दुसऱ्या भावात असेल. आज आपण शेअर मार्केट किंवा लॉटरीत गुंतवणूक करू शकाल. अचानक धनलाभ होईल. कुटुंबातील वातावरण वादामुळं बिघडू शकतं. काही कारणानं गृहिणींना मनात असंतोष राहील. विद्यार्थ्यांनी अधिक कष्ट घ्यावेत. शारीरिक आरोग्य मध्यम राहील. डोळ्यांचे त्रास संभवतात. नकारात्मक विचारांवर पूर्णतः संयम ठेवावा लागेल. साहसी वृत्ती असलेल्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे.
कुंभ (AQUARIUS) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्टया आनंदी राहाल. व्यावहारिक अनुभव चांगले येतील. कुटुंबीयांसह प्रवासाचा आनंद घ्याल.
मीन (PISCES) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून बाराव्या भावात असेल. आज मन अशांत राहिल्यामुळं एकाग्रतेचा अभाव दिसून येईल. एखाद्या मांगलिक कार्यासाठी पैसा खर्च होईल. आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करावी. स्वकियांशी मतभेद संभवतात. एखादया लहानशा फायद्यासाठी मोठे नुकसान होणार नाही याचा विचार करावा लागेल. कोर्टाची कामे काळजीपूर्वक करावी लागतील.