
आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन चांगलं राहील, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य (Horoscope) कसं असेल?, जाणून घ्या आचार्य सरिता शर्मा यांच्या आजच्या राशीभविष्यात….
मेष (ARIES) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात असेल. आजचा दिवस समाजकार्य आणि मित्रांसोबत धावपळीत जाईल. त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. सरकारी कामात मात्र यश मिळेल. वडीलधारी आणि आदरणीय व्यक्तींचा सहवास लाभेल. दूरवर राहणार्या संततीकडून आनंददायी बातम्या मिळतील. पर्यटनाला जाण्याची शक्यता आहे. अविवाहितांचे विवाह ठरतील.
वृषभ (TAURUS) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशम भावात असेल. आज आपण नवे काम सुरू करू शकाल. नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे. नोकरीत पदोन्नती आणि पगार वाढीची बातमी मिळेल. सरकारकडून लाभ मिळेल. सांसारिक जीवनात सुख-शांती मिळेल. वरिष्ठ अधिकार्यांकडून प्रोत्साहन मिळाल्यानं आपला उत्साह वाढेल. अपूर्ण कामे तडीस जातील. दांपत्य जीवनात गोडी वाटेल. सरकारकडून लाभ मिळतील.
मिथुन (GEMINI) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून भाग्यात असेल. आजचा दिवस नवीन काम सुरु करण्यास प्रतिकूल आहे. शरीरास थकवा आणि आळस असल्यामुळं कामात उत्साह वाटणार नाही. पोटाच्या व्याधी त्रस्त करतील. नोकरी – व्यवसायात सुद्धा प्रतिकूल वातावरण असेल. वरिष्ठांच्या नाराजीला तोंड द्यावं लागेल. खर्चात वाढ होईल. महत्वाच्या कामातील कोणताही निर्णय आज घेऊ नये.
कर्क (CANCER) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टम भावात असेल. आज राग आणि नकारात्मक विचार मानसिक स्वास्थ्य हरवून टाकतील. त्यामुळं आज संयम राखणं आवश्यक आहे. खाण्या-पिण्याकडं लक्ष दिलं नाही तर प्रकृती नक्कीच बिघडेल. कुटुंबात वादविवाद होतील. खर्चात वाढ झाल्यानं आर्थिक चणचण भासेल. नवे संबंध उपयुक्त ठरतील. नवे काम सुरू न करणं हिताच राहील.
सिंह (LEO) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सातव्या भावात असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. नोकरी – व्यवसायात मतभेद होण्याची शक्यता आहे. आपली प्रकृती उत्तम राहील पण जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळं मनात काळजी राहील. सामाजिक जीवनात यश मिळेल. भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास घडेल. मात्र या सहवासाचा त्रास होण्याचं शक्यता असल्यानं सावध राहावं.
कन्या (VIRGO) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहाव्या भावात असेल. आज उत्साह आणि स्वास्थ्य उत्तम राहील. घरी आणि नोकरीच्या ठिकाणी वातावरण आनंदी राहील. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा होईल. स्त्रीयांना माहेरहून आनंददायी बातमी मिळेल. कार्यात यशस्वी व्हाल. अपेक्षेपेक्षा जास्त खर्च होईल.
तूळ (LIBRA) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचव्या भावात असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. संततीची काळजी सतावेल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी येतील. वाद-विवाद, बौद्धिक चर्चा यापासून शक्यतो दूर राहावं. आज सुरू केलेलं काम पूर्ण होऊ शकणार नाही. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. एखादी मानहानी संभवते. शक्यतो प्रवास टाळावेत.
वृश्चिक (SCORPIO) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून चौथ्या भावात असेल. आजचा दिवस शक्य तितक्या शांतचित्तानं घालवावा. आर्थिक हानीची शक्यता आहे. कोणत्याही प्रकारचे दस्तावेज काळजीपूर्वक करावेत.
धनू (SAGITTARIUS) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून तिसऱ्या भावात असेल. आजचा दिवस नव कार्यारंभास शुभ फलदायी आहे. भावंडांशी सलोखा वाढेल. तसेच कुटुंबीयांसह प्रवासाचे बेत ठरवाल. आरोग्य उत्तम राहील. नशिबाची साथ लाभेल. गूढ विषयांची गोडी वाटेल. आज कार्यसिद्धीचा दिवस आहे. सामाजिक मान – सन्मान होतील.
मकर (CAPRICORN) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दुसऱ्या भावात असेल. आज कुटुंबियांशी वाद होण्याची शक्यता आहे. बोलण्यातील संयमच आपणाला वादातून बाहेर काढेल. सट्टे बाजारात गुंतवणूक करण्याचे नियोजन कराल. प्रकृती साधारणच असेल. डोळ्यांचा त्रास संभवतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष द्यावे.
कुंभ (AQUARIUS) : चंद्र कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. आज आपण शरीरानं आणि मनाने उत्साहित असाल. आजचा दिवस लाभदायी आहे. मित्र-कुटुंबियांसह एखाद्या सहलीला जाऊ शकाल. एखाद्या विषयात प्रगती करू शकाल. मित्राकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन सुखी राहील. नकारात्मक विचारापासून दूर राहणं हितावह राहील.
मीन (PISCES) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून बाराव्या भावात असेल. आज आर्थिक व्यवहार सावधपणे करावेत. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी पूर्ण विचार करा. प्रकृती बिघडू शकते. मनाची एकाग्रता होणार नाही. मांगलिक कार्यावर पैसा खर्च होईल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात.