*दिनेश अंब्रे /संगमेश्वर.-* संगमेश्वर तालुका नाभिक समाज संघाची सर्वसाधारण सभा नावडी येथे सुभाष अंब्रे यांच्या निवासस्थानी सकाळी ११ वाजता संपन्न झाली.
अभिजीत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपाध्यक्ष सतीश पवार कार्यकारणी सदस्य माजी अध्यक्ष परशुराम चव्हाण सल्लागार प्रकाश पवार वैभव भोसले यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या सभेचे दीप प्रज्वलन अध्यक्षांच्या शुभहस्ते करून श्री संत सेना महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. व दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यानंतर श्री संत सेना पुण्यतिथी कार्यक्रमाचा जमाखर्च अहवाल, ग्रामीण भागातील सुधारित दरवाढ, नाभिक बांधवांच्या अडीअडचणी सोडवण्यासंबंधी चर्चा करण्यात आली. या संघाला वीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अध्यक्ष अभिजीत चव्हाण यांनी तालुक्यातील नाभिक बांधवांना शुभेच्छा दिल्या.
नाभिक समाजाचे आधारस्तंभ व माजी अध्यक्ष’ चंद्रकांत अंब्रे यांचा अध्यक्ष अभिजीत चव्हाण व पदाधिकारी यांच्या हस्ते येथे सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचा समारोप व आभार प्रदर्शन दिनेश अंब्रे यांनी केले.
या सभेसाठी धामापूर बुरंबाड मुरडव राजीवली धामणी तुरळ साखरपा वांद्री, तेर्ये बुरंबी ,देवरुख कोसूंब , डिंगणी , फुंणगुस आदी गावातून बहुसंख्येने बांधव उपस्थित होते.