पैसा फंड चे अध्यक्ष श्री अनिल शेठ शेट्ये यांचा ७० वा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न ….

Spread the love


संगमेश्वर दिनेश अंब्रे- संगमेश्वर नावडी गणेशाळी येथील प्रसिद्ध व्यापारी व पैसा फंड इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष श्री अनिल गजानन शेट्ये यांचा त्यांच्या निवासस्थानी त्यांचा 70 व्या वाढदिवसानिमित्त परिवारातील सदस्य व पाहुणेमंडळी यांनी औक्षण करून व केक कापून अभिष्टचिंतन सोहळा साजरा केला.
   

सुविद्य पत्नी सौ. अर्चना यांची अविरत साथ लाभली वयाच्या पंधराव्या वर्षापासून वडील कै. गजानन महादेव शेट्ये यांच्या पान व्यवसायात मदत करायला त्यांनी सुरुवात केली. त्यावेळेस सायकल वरून प्रवास करून फुनगूस  व इतर पंचक्रोशीत जाऊन वडिलांच्या व्यवसायात मोलाची साथ देऊन व्यवसाय वाढवला.
      

संगमेश्वर मध्ये संपूर्ण सणांमध्ये, सामाजिक कार्यामध्ये तसेच संगमेश्वर मधील प्रत्येक उत्सवांमध्ये वयाच्या दहाव्या वर्षापासून ते आत्तापर्यंत ते सहभागी झालेले आहेत. गणेश मंदिरातील पहाटेची काकड आरती, शिंपणे उत्सव,  होळी, इत्यादी उत्सवामध्ये  तरुणांना लाजवतील असा उत्साह त्यांच्या अंगी असतो. उत्सवात ढोल वाजवताना  त्यांच्यातील प्रचंड उत्साह आणि उमेद तरुणांना शिकण्यासारखे असते.


     

तरुण मंडळींनी  गावातले उत्सव  चालू ठेवण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात.  तसेच संगमेश्वरातील व पंचक्रोशीतील दुःखद घटनेच्या वेळी  सुद्धा ते तिथे उपस्थित असतात व मार्गदर्शन करून सहकार्य करतात. माणुसकीचे उत्तम उदाहरण म्हणून श्री. अनिल शेठ शेट्ये यांच्याकडे पाहिले जाते.
       

त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले व स्वकष्टाने उभे राहण्याची शिकवण दिली.  त्यांची मुले अमृता, तृप्ती,अक्षय, अपर्णा,  त्यांचे भावोजी श्री चारुदत्त भिंगार्डे,  जावई श्री राहुल कोकाटे,  श्री आशिष वार्डे, श्री कौस्तुभ भिंगार्डे त्यांचे बंधू श्री अरविंद शेट्ये, विकास शेट्ये नितीन शेट्ये सर्व परिवारातील मंडळी तसेच त्यांचे पुतणे सुतेज, धनंजय,  स्वप्निल, प्रेषित, अंकुर, स्वरूप,  आणि परिवारातील सर्व सदस्य यांनी त्यांचा दिवे ओवाळून व त्यांची नात आर्या आणि सून सुविधा  यांच्या सुमधुर गीताने औक्षण केले.


     

परिवारातील मंडळी तसेच पैसा फंडचे सचिव धनंजय शेट्ये सर, मुख्याध्यापक खामकर सर, शिक्षक विनोद ढोर्लेकर सर,  सर्व शिक्षक,  मित्रमंडळी यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
       

माजी विद्यार्थी श्री दिनेश हरिभाऊ अंब्रे ( सामाजिक कार्यकर्ते) यांनी श्री अनिल शेठ शेट्ये यांचा पुष्पगुच्छ देऊन तसेच शिक्षक दिनानिमित्त शिक्षिका सौ अर्चिता (अमृता) राहुल कोकाटे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. शिक्षक दिनी वडील व मुलगी यांच्या एकत्रित सत्काराने सर्वांचा आनंद द्विगुणीत झाला व नात्याला उजाळा मिळाला.
      

यावेळी चेअरमन आणि शेठ शेटे म्हणावे की कुटुंबीय मित्रमंडळी शिक्षक व नातेवाईक व्यापारी व हितचिंतक यांची मोलाची साथ लाभली, प्रेमही मिळाले. पत्नी सौ अर्चना हीची  मोलाची साथ लाभल्यामुळे मला हि सामाजिक शैक्षणिक कार्य करता आले. त्यात तिचाही वाटा आहे असे आवर्जून त्यांनी सांगितले.
      

संगमेश्वर पागआळी भंडारवाडा आणि नावडी यातील महिलांनी त्यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पा समोर दोन तास सुंदर  भजन, गवळणी सादर केल्या. यावेळी त्यांचा नातू अलक्ष याची तबला वादनाची सुंदर साथ मिळाली. तबला आणि आफ्रिकन वाद्य ” झिंबे ” या दोन्हीचा उत्तम सादरीकरण त्यांनी केलं.

🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page