
संगमेश्वर /वार्ताहर – व्यापारी पैसा फंड संस्था संगमेश्वर संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूलमध्ये सातवी इयत्तेत शिकणारी कु.क्रिशा कपील इंदानी या विद्यार्थिनीने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावून सुयश प्राप्त केले आहे.
याबद्दल नावडी येथील सामाजिक कार्यकर्ते जनार्दन लक्ष्मण शिरगावकर व माजी विद्यार्थी तसेच माजी सैनिक पाल्य श्री. दिनेश हरिभाऊ अंब्रे यांनी माभळे येथे त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन शालेय साहित्य व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व अभिनंदन करून पुढील यशाच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी तिची आई अपर्णा कपिल इंदानी व पैसा फंड हायस्कूलच्या शिक्षिका सौ.श्रद्धा जोशी आदी उपस्थित होते. कुमारी क्रिषा हिने शैक्षणिक वर्ष 2024 -25 यामध्ये अनेक वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा या मध्ये तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त केले आहेत .
याबद्दल संस्थेचे चेअरमन श्री अनिल शेठ शेट्ये, सचिव धनंजय शेट्ये, मुख्याध्यापक श्री. सचिन देव खामकर, क्रीशा हीला मार्गदर्शन करणारे शिक्षक वृंद यांचे विशेष अभिनंदन सर्व स्तरातून क्रिशा इंदानी हिच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.