
संगमेश्वर/ दिनेश अंब्रे- प्रशालेमध्ये हर घर तिरंगा अंतर्गत 13, 14 आणि 15 ऑगस्ट रोजी विविध उपक्रम घेण्यात आले. त्यामध्ये 13 ऑगस्ट रोजी ध्वजवंदन, राष्ट्रगीत, राज्य गीत संविधान, देशभक्तीपर गीत, तिरंगा रांगोळी उपक्रम, देशभक्ती वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा , 14 ऑगस्ट रोजी पसायदान, तिरंगा सेल्फी आणि 15 ऑगस्ट रोजी संपूर्ण कार्यक्रम, कवायत प्रकार, समूहगीत, देशभक्तीपर गीत घेण्यात आले विद्यार्थ्यांचा उत्साह अप्रतिम होता.
यावर्षी देशभक्तीपर गीताच्या बोलावर विद्यार्थ्यांनी पंचरंगी कवायत सादर केली. संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री अनिल शेठ शेट्ये यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यानंतर राज्यगीत, देशभक्तीपर गीत, संविधान, एमसीसी परेड कवायतीचे विविध प्रकार विद्यार्थ्यांनी सादर केले.





संगमेश्वर तालुक्यामध्ये गेले तीन दिवस पावसाचा जोर कायम असून आज स्वातंत्र्यदिना दिवशी सुद्धा पावसाची दमदार हजेरी होती . विद्यार्थ्यांमध्ये देश भावना रुजावी म्हणून हर घर तिरंगा अंतर्गत वेगवेगळे उपक्रम प्रशालेमध्ये आयोजित केले जातात. एवढ्या पावसातही 15 ऑगस्टच्या दिवशी विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दहावी आणि बारावी मध्ये प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. अनिल शेठ शेट्ये, उपाध्यक्ष किशोर शेठ पाथरे, सचिव धनंजय शेट्ये सर, सहसचिव शिंदे सर, सदस्य संदीप शेठ सुर्वे, सदस्य रमेश शेठ झगडे, संगमेश्वर चे प्रतिष्ठित सन्माननीय व्यापारी बंधू, मुख्याध्यापक खामकर सर, ज्येष्ठ शिक्षक दळवी सर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक उपस्थित होते.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर