LPG सिलेंडरवर मिळणार ३०० रुपयांची सबसिडी ; मोदी सरकारचा निर्णय

Spread the love

नवी दिल्ली :- दिवाळीपूर्वीच केंद्रातील मोदी सरकारने सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान(सबसिडी) २०० रुपयांवरुन ३०० रुपये करण्याचा निर्णय केंद्र सरकारने आज झालेल्या बैठकीत घेतला. रक्षाबंधन आणि ओणमच्या निमित्ताने एलपीजीच्या दरात २०० रुपयांची कपात करण्याची घोषणा मंत्रिमंडळाने केली होती. आज ही रक्कम २०० रुपयांवरुन ३०० रुपये करण्यात आली आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले की, पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. रक्षाबंधन आणि ओणमच्या निमित्ताने आम्ही LPG सिलिंडर २०० रुपयांनी कमी केले होते. ही किंमत ११०० रुपयांवरून ९०० रुपयांपर्यंत कमी केली. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना ७०० रुपयांना गॅस मिळू लागला. पण, आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना ३०० रुपये अनुदान मिळणार आहे. म्हणजेच उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना फक्त ६०० रुपयांना गॅस सिलिंडर मिळणार आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page